Ranjeet Patil Sarkarnama
विदर्भ

Akola Politics : रणजित पाटील 'ॲक्टिव्ह मोड'वर; मोठा निर्णय घेणार

Maharashtra Politics : अकोला पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणातून दिसेनासे झाले होते.

जयेश गावंडे

Akola Political News : अकोला पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे 'जिल्ह्याच्या राजकारणातून दिसेनासे झाले होते. एखादा अपवाद वगळला तर भाजपच्या एकाही कार्यक्रमात ते दिसले नाहीत, तर दुसरीकडे आगामी निवडणुका पाहता जिल्ह्यातील धोत्रे यांचा गट अधिक 'ॲक्टिव्ह' झाला आहे. यासंदर्भात 'सरकारनामा'ने बातमीही प्रकाशित केली होती.

मात्र, आता डॉ. रणजित पाटील हे रोजगार मेळाव्यातून जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा 'ॲॅक्टिव्ह मोड'वर येणार असल्याचे बोलले जात आहे. रणजित पाटील यांनी अकोल्यात बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या माध्यमातून रणजित पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोजगार मेळाव्याच्या आयोजनामुळे डॉ. पाटील यांची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

रोजगार मेळाव्यातून 'ॲक्टिव्ह मोड'मध्ये येण्याचा प्रयत्न

अकोला जिल्हा भाजपत खासदार संजय धोत्रे आणि माजी राज्यमंत्री रणजित पाटील यांचे दोन गट आहेत. विद्यमान खासदार संजय धोत्रे हे प्रकृती अस्वस्थतेमुळे सक्रिय नसले तरी धोत्रेंचा गट मात्र 'ॲक्टिव्ह'आहे, तर दुसरीकडे डॉ. रणजित पाटील यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर ते जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय नसल्याचं दिसून आले, तर दुसरीकडे विद्यमान खासदार संजय धोत्रे हे आजारपणामुळे सक्रिय नसले तरी त्यांचा गट मात्र सक्रिय आहे. धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना भाजपकडून 'प्रोजेक्ट' करण्यात येत आहे.

अनुप धोत्रे यांना लोकसभेसाठी संधी मिळावी, अशी अकोल्यातील भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे, तर नुकत्याच पार पडलेल्या आरोग्य मेळाव्यातून अनुप धोत्रे यांना 'पुढे' करण्यात आलं आहे. असे असताना आता रोजगार मेळाव्यातून पाटील गट 'ॲक्टिव्ह मोड'वर येण्याच्या प्रयत्नात आहे. आगामी निवडणुकांसाठी धोत्रे गटांकडून जोरदार तयारी होत असताना शांत असलेल्या डॉ. पाटील गटाकडूनही आता आगामी निवडणुकांसाठी 'रणनीती' आखली जात असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीतील पराभवानंतर 'ॲक्टिव्ह' नसलेल्या डॉ. पाटील यांनी आता युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याने चर्चा सुरू झाली आहे.

आरोग्य मेळाव्यानंतर रोजगार मेळाव्याचे आयोजन!

नुकतेच शासकीय रुग्णालयात भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीसाठी धोत्रे गटांकडून अनुप धोत्रे यांना 'प्रोजेक्ट' करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्याला आले होते. फडणवीस यांनीही आपल्या भाषणातून अनुप धोत्रे यांनी केलेल्या मेळाव्याच्या आयोजनाची स्तुतीही केली होती. मात्र, या आरोग्य मेळाव्यापासून डॉ. रणजित पाटील हे 'दूर' होते. आता डॉ. पाटील यांनीही अकोल्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा उद्या बुधवारी (11ऑक्टोबर ) पार पडणार आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता डॉ. पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केल्याची चर्चा आहे.

'मी पुन्हा आलो'!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळख असलेले माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा 2023 च्या पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांनी पराभव केला. त्यानंतर रणजित पाटील हे जिल्ह्यातील राजकारणात 'अक्टिव्ह' नसल्याचे दिसून आले. डॉ. पाटील आपल्या वैद्यकीय व्यवसायात 'बिझी' झाल्याचे पाहायला मिळाले. ते 'वेट अँड वॉच' भूमिकेत असल्याची बातमी 'सरकारनामा' दिली. काहीच दिवसांत डॉ. पाटील यांनी मेळाव्याचे आयोजन केल्याने 'मी पुन्हा आलो' असं, तर रणजित पाटलांना सांगायचे नसेल.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT