MLA Sudhir Mungantiwar
MLA Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

राऊत यांचं मन चंचल, मग ते अस्थिर होईल अन् काय बोलतील याचा नेम नाही !

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : जेवढे दिवस आवश्यकता असेल, तोपर्यंत वेट अँड वॉचची आमची भूमिका राहील. या भूमिकेला वेळेचे आडाखे बांधता येत नाही. पण महाराष्ट्रातील जनतेचे नुकसान होणार नाही, यासाठी आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. येथे विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या अस्थिर परिस्थिती आहे, मात्र अशा अस्थिर परिस्थितीमध्ये ही काही लोक स्थिर मनाने जीआर काढून पैसे कमावण्याच्या कामात लागले आहे, अशी शंका भाजपला (BJP) आल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यपालांना पत्र दिले आणि अशा पत्रावर प्रशासनाकडून खुलासा घेणे हे राज्यपालांचे कर्तव्यच आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या म्हणण्यावर भाष्य करण्याची वेळ आलेली नाही. जशी जशी महाराष्ट्राची परिस्थिती अस्थिर होईल, तेवढेच राऊत यांचे मन चंचल आणि अस्थिर होईल आणि अस्थिर मनाने ते काय भाष्य करतील याचा भरवसा नाही. वराह, रेडे, डबके असे नवनवीन शब्द महाराष्ट्राला आता ऐकावे लागतील, असे आमदार मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) म्हणाले.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केले होते. याबाबत विचारले असता आमदार मुनगंटीवार म्हणाले, ही माहिती माझ्याकडे नाही. संजय राऊत याच्याबद्दल सांगू शकतील. आम्हाला वाटते की आता महाविकास आघाडी सरकारने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही, हे त्यांनी विचारपूर्वक समजून घ्यावं आणि त्यांच्याकडे बहुमत नसेल तर त्यांनी योग्य निर्णय करावा.

सामना शिवसेनेचे मुखपत्र आहे. त्यामुळे त्यात काय लिहिले जाते, यावर विचार करण्याची गरज नाही. मुखपत्राचं वितरण वाढवण्यासाठी असं लिहिलं जात असावं, असे सांगताना ते म्हणाले की, भाजपला सध्या तरी आपले बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही. आम्ही हे पाहतोय की महाविकास आघाडी त्यांचा अल्पमत केव्हा सिद्ध करेल. कुणी काहीही बोलत असेल तर ती भाजपची पक्ष म्हणून भूमिका आहे असं त्याचा अर्थ घेता येणार नाही. राज्यात सध्या जी काही परिस्थिती उद्भवली आहे, अशात काहीही चर्चा सुरू आहेत. पण मी काही आमच्या आमदारांना मुंबईत न्यायला येथे आलेलो नाही, तर पक्षाची संघटनात्मक बैठक आहे, त्यासाठी येथे आलो आहे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT