Ravikant Tupkar Sarkarnama
विदर्भ

Ravikant Tupkar : न्यायालयाच्या निकालापूर्वी कार्यकर्त्यांना दिला मोठा कानमंत्र, म्हणाले...

Buldhana Political News : विरोधक अडकविण्यासाठी षडयंत्र रचत आहेत

सरकारनामा ब्युरो

फहीम देशमुख

Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा जामीन रद्द करून त्यांना तुरुंगात टाका, असा अर्ज बुलडाणा शहर पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात केलेला आहे. या अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी (ता. 16) फेब्रुवारीला सुनावणी संपल्यानंतर रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. तुपकर म्हणाले की, जर निकाल विरोधात गेला तरीही आक्रमक होऊ नका. विरोधक आपल्याला अडकविण्यासाठी षडयंत्र रचत आहेत. त्याला बळी पडू नका. बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्ह्यासह नागपूर, मुंबईसह राज्यभरात आंदोलने केली. त्यावरून पोलिसांनी दाखल गुन्ह्यांमध्ये जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाला केली आहे.

आंदोलनाचे फलित म्हणून तुपकरांवर आतापर्यंत 21 गुन्हे पोलिसांत दाखल झालेले आहेत. सर्व प्रकरणे सध्या विविध न्यायालयांमध्ये न्यायप्रविष्ठ आहेत. मागील दोन महिन्यांमध्ये तुपकरांनी मंत्रालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न, नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा आणि रेल्वे रोकोसारख्या आंदोलनांची घोषणा केली. त्यापैकी अनेक आंदोलने यशस्वीही केली. पोलिसांनी वेळोवेळी तुपकर त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केलेत. अशात आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना तुपकरांचे आंदोलन आणखी तीव्र होत आहे. पोलिस प्रशासनाने याबाबत कायमचा बंदोबस्त करण्यासाठी रविकांत तुपकर यांच्या गुन्ह्यांचा आढावा घेत न्यायालयाकडे याबाबतचा लेखाजोखा मांडला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुपकर यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यांची जंत्री पोलिसांनी न्यायालयाला सादर केली आहे. त्यातून त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून या प्रकरणात बुलडाणा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बुलडाणा न्यायालयाने 16 फेब्रुवारीला यावर निर्णय देण्याचे ठरविले होते. मात्र, ऐनवेळी सरकार पक्षाच्या वतीने यामध्ये नव्याने बाजू (आर्ग्युमेंट) मांडण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाच्या परवानगीने नव्या पद्धतीने बाजू त्यांनी मांडली. त्यामुळे तुपकरांना ‘जेल की बेल’ हा निर्णय जिल्हा सत्र न्यायालयात होऊ शकला नाही.

जिल्हा सत्र न्यायालयाने आता 21 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. याच दिवशी तुपकरांच्या राजकीय भविष्यावर न्यायालय निर्णय देणार आहे. तुपकरांच्या जामिनावर निकाल काहीही लागला, तरी लोकसभा निवडणूक लढण्यावर आपण ठाम आहोत. पोलिसांच्या दबावामुळे वेळप्रसंगी जेलमधून लोकसभा निवडणूक लढू, असा निर्धार रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला आहे. न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तरीही आक्रमक होऊ नका. विरोधक अडकविण्यासाठी मोठे षडयंत्र रचत आहेत. त्यामुळे सावध राहा, असा कानमंत्र तुपकरांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT