Hingoli Vaccination  Sarkarnama
विदर्भ

जिल्हाधिकाऱ्यांनी लढवली नामी शक्क्ल: हिंगोलीत रेकॉर्डब्रेक लसीकरण

ज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता सर्वच तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या संभाव्य तिसऱ्या कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी, केंद्र व राज्य शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

सरकारनामा ब्युरो

लस (Vaccine) टोचून घेतली नाही तर, राशन (Ration) नाही, सातबारा (Satbara) ही मिळणार नाही, असा इशारा हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर (Hingoli Collector Jitendra Papalkar) यांनी दिला होता. या इशाऱ्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या इशाऱ्यानंतर, मागील चार दिवसात हिंगोली जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक लसीकरण झाले आहे.

याबाबत स्वत: हिंगोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार (Health Officer Shivaji Pawar) यांनी माहिती दिली. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता सर्वच तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या संभाव्य तिसऱ्या कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी, केंद्र व राज्य शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचनेनुसार देशातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणे गरजेचे असल्याने आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरील आरोग्य यंत्रणा गावागावात, छोट्या पाड्यांवर जाऊन लसीकरण केंद्रे आणि शिबीरांद्वारे नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवत आहे. असल्याचे यावेळी शिवाजी पवार यांनी सांगितले.

मात्र असे असले तरी, अनेक गावात प्रशासनाच्या लसीकरण मोहिमेकडे नागरिक कानाडोळा करत लसीकरण करत नसल्याची बाब लक्षात आली. त्यामुळे संपूर्ण राज्यात हिंगोली जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी कमी झाली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने यावर नामी शक्कल लढवत लस टोचून घेतली नाही तर, राशन नाही, सातबारा ही मिळणार नाही, असा थेट इशाराच जिल्ह्यातील नागरिकांना दिला. विशेष म्हणजे याचा सकारात्मक परिणामही दिसून आला.

हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आठ दिवसांपूर्वी, जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणांची बैठक घेत यापुढे लसीकरण नाहीतर सातबारा नाही लसीकरण नाहीतर राशनही मिळणार नाही अशी तंबी देण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या इशाऱ्यानंतर स्थानिक आरोग्य यंत्रणानीही मग याबाबत पुढाकार घेत नागरिकांना लसीकरणाचे आवाहन केले.ज्यामुळे चार दिवसातचं हिंगोलीत रेकॉर्डब्रेक लसीकरण झाले. असे शिवाजी पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT