Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar News : सरळ सेवा भरतीचे शुल्क कमी करा, अन्यथा...; प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला 'अल्टीमेटम'

Political News: आगामी लोकसभा निवडणुकी करीता निधी जमवण्यासाठी खासगी कंपन्याचा वापर, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

Akola News: राज्यात सध्या जिल्हा परिषद सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या भरतीला आकारलेल्या शुल्क वसुलीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले आहे.

"बेरोजगारांकडून‌ ९०० ते‌ एक हजार रुपये शुल्क वसूल केले जात आहेत, हे अवाजवी शुल्क वसुली थांबावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल", असा अल्टीमेटम आंबेडकरांनी दिला.

राज्य सरकार खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ही पदभरती करत असून या पदभरतीच्या नावावर आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप करत आगामी लोकसभा निवडणुकी करीता निधी जमवण्यासाठी खासगी कंपन्याचा वापर सरकार करत असल्याचा गंभीर आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला. अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकसभेची निवडणूक जवळ आली असून यासाठी पदभरतीच्या नावावर उमेदवारांकडून खासगी कंपन्यांच्या माध्यमातून शुल्क वसूल करत फंड उभा करण्यात येत असून या शुल्काचे वाटेकरी कोण?, असा गंभीर आरोप करत आंबेडकरांनी सवाल विचारला आहे. 'एमपीएससी'च्या परिक्षांसाठी आकारले जाते, तशा प्रकारे शुल्क वसुली करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT