Nana Patole, Sharad Pawar  Sarkarnama
विदर्भ

'पवार साहेबांनी माझी तक्रार केली असेल तर मला आनंदच आहे!'

नाना पटोले (Nana Patole) यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.

Abhijeet Ghormare

भंडारा : राज्यात सध्या महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्य नाना पटोले (Nana Patole) यांनी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेवर (Shivsena) जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळे हे दोन्ही घटक पक्ष नाराज आहेत. त्यामुळे पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. त्यावर स्वत: नाना पटोले यांनी भाष्य केले आहे.

नाना पटोले भंडाऱ्यामध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी माझी तक्रार काँग्रेस हायकमांड कडे केली असेल, तर मला आनंद आहे. हे छान झाले, मी शरद पवार साहेब आणि काँग्रेस हायकमांड असे तिघे बसुन महाराष्ट्रासाठी योग्य तो निर्णय घेऊ, असा टोला पटोले यांनी लगावाल.

नाना पटोलें यांना हटवण्याचे संकेत दिले जात असून त्या संदर्भात शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी आपली नाराजी काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के पाटील यांच्याकडे केली आहे. त्यावर पटोले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सोबत युती केली आहे. त्यावरुन राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरु खुपसला अशी जहरी टिका पटोले यांनी केली होती. त्यावर पटोले यांनी राष्ट्रवादीला किती वेळी धोका दिला आहे, याची याचीच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली होती. त्यावरुन मोठ्या प्रमाणात शाब्दीक वादही रंगला होता. राष्ट्रवादी विरोधात पटोले आक्रमक झाले आहेत. पटोले यांच्या आक्रमक स्वभावामुळे महाविकास आघाडीत मतभेद होत असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT