Department of Revenue Sarkarnama
विदर्भ

Revenue Department News : आता उद्या रात्री ११.५५ पर्यंत करता येणार तलाठी भरतीसाठी अर्ज !

Sarkarnama Impact : आनंद रायते यांनी शुद्धिपत्रक काढून एका दिवसाची मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले.

Atul Mehere

Candidates could not fill the application form : तलाठी पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी असणारी महाराष्ट्र शासनाची महसूल विभागाची वेबसाइट सोमवारी दिवसभर बंद होती. त्यामुळे उमेदवारांना अर्ज भरता आला नाही. यासंदर्भात ‘सरकारनामा’ने बातमी प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर थोड्याच वेळात महसूल व वनविभागातर्फे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी शुद्धिपत्रक काढून एका दिवसाची मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले. (The revenue department's website was down all day on Monday)

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत तलाठी (गट क) संवर्गातील एकूण ४ हजार ६४४ पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज (ता. १७ जुलै) शेवटचा दिवस होता. अशात सकाळी ११ वाजेपासूनच वेबसाइट बंद होती. अनेक उमेदवारांना अर्ज भरण्यात अडचण जात असल्याची माहिती मिळताच ‘सरकारनामा’ने ‘अखेरचे काहीच तास उरले असताना ‘ई-महाभूमी’ अंडर मेंटनन्स कशी? हेल्पलाइनही ‘नो-रिस्पॉन्स’!’ ही बातमी देऊन पाठपुरावा केला.

संध्याकाळी ई-महाभूमी (महसूल (Revenue) व वनविभाग) अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी यासंदर्भात मुदतवाढीबाबत शुद्धीपत्रक काढले. आता तलाठी संवर्गातील रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीची मुदत जी १७ जुलै रोजी ११.५५ होती. ती आता अंतिम दिनांक १८ जुलै रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षेचा शुल्क भरण्यासाठी २० जुलै रात्री ११.५५ अशी वेळ देण्यात आली आहे. ‘सरकारनामा’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे तलाठी पदभरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळाल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.

बहुप्रतीक्षित असलेली तलाठी पदभरती अखेर (Eknath Shinde) शिंदे - फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने काढली. पहिल्यांदाच साडेचार हजारहून अधिक तलाठ्याची पदे भरली जाणार आहेत. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून चाचणी कॉम्प्यूटर बेस्ड टेस्ट असणार आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. ऑनलाइन परीक्षेप्रमाणे अर्ज करण्याची प्रक्रियासुद्धा ऑनलाइनच आहे.

२६ जूनच्या रात्री १२ वाजेपासून तर १७ जुलैच्या रात्री ११.५५ पर्यंत अर्ज भरण्यासाठी वेबसाइट खुली ठेवण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. ई-महाभूमी या महसूल व वनविभागाच्या वेबसाइटवर तलाठी पदभरतीची ऑनलाइन लिंकही उपलब्ध होती. मात्र ही वेबसाइट ऐन शेवटच्या दिवशी म्हणजे आज (ता. १७) सकाळी ११वाजतापासून बंद दाखवत असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली होती.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT