Rohit Pawar On Ram Shinde  Sarkarnama
विदर्भ

Rohit Pawar: "गल्लीतलं भांडण आणलं सभागृहात"; रोहित पवारांनी राम शिंदेंना पुन्हा डिवचलं

Rohit Pawar: आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यातील भांडणं नेहमीच चर्चेचा विषय होतात.

Rajesh Charpe

नागपूर: आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यातील भांडणं नेहमीच चर्चेचा विषय होतात. जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केलेल्या टीकेनेही शिंदे दुखावले, त्यांनी गल्लीतील भांडण सभागृहात आणले. त्यांनी एवढ्या मोठ्या पदावर विराजमान असताना त्याची गरिमा कशी राखावी याचे धडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर याचे धडे घ्यावे असा सल्ला रोहित पवार यांनी देऊन पुन्हा राम शिंदे यांना पुन्हा डिवचलं आहे.

जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सूर्यकांत मोरे यांनी राम शिंदे यांच्यावर टीका केली होती, ती त्यांना चांगलीच झोंबली आहे. यावर शिंदे यांनी हक्कभंग आणला आहे. त्यावरून रोहित पवार यांनी एवढ्याशा टीकाटिप्पणीवरून हक्कभंग काढणे म्हणजे पदाच्या प्रतिष्ठेचा गैरवापर आहे. माझ्या सहकाऱ्याने केलेली टीका हा त्यांचा पदाचा अपमान नव्हता. मात्र, त्या टीकेने त्यांचा अहंकार दुखावल्याने त्यांनी गल्लीतील भांडण थेट सभागृहात आणणे ही दुर्दैवी बाब आहे. मोरे भावनेच्या भरात बोलले. निवडणूक काळात आरोप-प्रत्यारोप होतच असतात. त्यावरून हक्कभंग काढणे म्हणजे पदाच्या प्रतिष्ठेचा गैरवापर करणे होय.

ते पुढे म्हणाले, निवडणूक काळात राम शिंदे चार गाड्यांच्या ताफ्यासह फिरत होते. आम्ही सामान्य कुटुंबातील उमेदवार दिला, तर शिंदे यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिली. त्यावर टीका केली म्हणून अशा किरकोळ विषयावर सभागृहात चर्चा होणे दुर्दैवी आहे. तुम्ही पदावर बसून वागता कसे, बोलता कसे हे बघावे. तुम्ही पदाची गरिमा राखली तर कार्यकर्ते आणि पदाधिकारी तुमच्याबद्दल आदराने बोलू शकतात, असा टोलाही त्यांनी राम शिंदेंना लगाविला. विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला. तेव्हापासून दोन्ही नेत्यांनी नेहमीच शाब्दिक भांडणे सुरू असतात. शिंदे यांना विधान परिषदेवर घेऊन भाजपने त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT