Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
विदर्भ

Rohit Pawar News : 'प्रफुल पटेलांना आता मिरचीही गोड लागते' ; रोहित पवारांचा खोचक टोला!

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election 2024 : महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये माझीच पैदास आहे, असे वक्तव्य नेत्यांवर केले होते. यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारां यांनी प्रफुल पटेलांवर टीका करत, त्यांना टोलाही लगावला.

रोहित पवारांनी(Rohit Pawar) प्रफुल पटेल यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. 'भाजपासोबत गेल्यानंतर अहंकार येतो CBI ची 8.50 कोटींची जी केस आहे ती बंद झाली आहे आणि आता त्यांना आपण काहीही बोललं तरी चालतं असं वाटत आहे. त्यांना मिरची देखील गोड लागत आहे.' अशा तिखट शब्दांमध्ये टीका करत इथं महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रफुल पटेलांच्या(Prafull Patel) बालेकिल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आले असता, त्यांनी सांगितले की या ठिकाणी महाविकास आघाडीचे डॉक्टर प्रशांत पडोळे हे निवडणूक लढवत आहेत. तर महायुतीचे ठेकेदार सुनील मेंढे हे निवडणूक लढत असून या मतदार संघात डॉक्टर विरुद्ध कॉन्ट्रॅक्टर अशी लढत होत आहे. असंही रोहित पवार म्हणाले.

तसेच, यांचे ठेकेदार रस्ता कामसाठी पैसे घेतात मात्र रस्ता हा केवळ कागदावरच राहतो, असं लोक सांगतात. या ठिकाणी धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती लढणार आहे. मात्र या मतदार संघात महाविकास आघाडीचाच उमदेवार निवडून येईल, असा दृढ विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

ही लोकं दिल्लीसमोर झुकली आहेत. मात्र आपण स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. त्यामुळे आपण दिल्लीसमोर झुकणार नाही. तुम्हाला तुरुंगात जाण्याची भिती होती म्हणून तुम्ही शरद पवारांना सोडलं, हे तुम्ही जनतेला ठामपणे सांगितलं पाहीजे. असं म्हणत रोहित पवारांनी प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT