Nagpur News : आज देशभरात विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते आहे. विविध राजकीय पक्ष, संघटनाही विजयादशमीचा सण साजरा करत आहेत. त्यानुसार राज्याची उपराजधानी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) वतीने भव्य पथ संचलनाचे आयोजन केले होते. या वेळी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचीही विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी उपस्थित होते. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या प्रसंगी गायक शंकर महादेवन म्हणाले, “मी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो. मला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे, याचा मला खूप सन्मान वाटतो. यासाठी मी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आभार मानू इच्छितो. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. 27 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीच्या दिवशी आरएसएसची स्थापना झाली. यावर्षी विजयादशमीच्या दिवशी संघाला 97 वर्षे पूर्ण होत असून 2025 मध्ये या संघटनेला 100 वर्षे पूर्ण होतील. नागपूरमधून उगम झालेला संघ आताच्या घडीला मोठी संघटना आहे.
(Edited by - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.