Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
विदर्भ

समाजवादी पार्टी म्हणते, आम्ही भोंगा उतरवणार नाही, राज ठाकरेंना फाशीची शिक्षा द्यावी!

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात भोंग्यावरून निर्माण केलेला वाद आता गंभीर वळण घेऊ लागला आहे. आज समाजवादी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन आम्ही मशिदीवरून भोंगा उतरवणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे.

समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) महासचिव एजाज खान आज प्रेस क्लबमध्ये म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन संप्रदायांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. आम्ही मशिदीवरून भोंगा खाली उतरवणार नाही आणि महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) विनंती करतो की, त्यांनी कायद्यांत तरतूद करून राज ठाकरे यांना फाशीची शिक्षा द्यावी. जोपर्यंत सरकार हा निर्णय घेणार नाही, तोपर्यंत राज ठाकरे जेथे जातील, तेथे आम्ही त्यांचा विरोध करू.

राज ठाकरे वैज्ञानिक नाहीत. त्यामुळे ते चुकीची विधाने करीत आहेत. भोंग्याच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण पसरत नाही. महाराष्ट्र सरकारने फार उशीर केला. यापूर्वीच त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. जो व्यक्ती जाती धर्माच्या नावावर वाद निर्माण करून समाजा समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल, अशा व्यक्तीवर कायद्यात संशोधन करू फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी एजाज खान यांनी केली.

राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या..

औरंगाबाद येथील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे पालन न करण्यात आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह आयोजकांवरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. एफआयआरमध्ये राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख प्रमुख आरोपी म्हणून केला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण राज ठाकरेंना अटक केल्यास ते मोठे होतील आणि महाविकास आघाडी तसे होऊ देणार नाही.

आजही राज ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी होते, पण त्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होत नाही. पण आता त्यांना अटक केल्यास केवळ सभेची गर्दी मतांत रूपांतरित होईल. २००८ साली असेच झाले होते. त्यावर्षी राज ठाकरेंना उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर महाराष्ट्रात मनसे कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात निदर्शन केली होती. त्यानंतर २००९ साली मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. त्यानंतर आता पुन्हा अटक झाल्यास राज ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा ताकद मिळू शकते आणि महाविकास आघाडी सरकार असे होऊ देणार नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT