Samruddhi Highway Sarkarnama
विदर्भ

Samruddhi Mahamarg News: `ती’ आग अजूनही धगधगतेय; ट्रॅव्हल्स संचालकांसह प्रवासी म्हणतात, आपला जुनाच मार्ग बरा...

Travels Owners On Samruddhi Mahamarg: दररोज ५० ते ६० ट्रॅव्हल्स धावत होत्या.

सरकारनामा ब्यूरो

The Incident of Vidarbha Travels added to it : समृद्धी महामार्गावर आजपर्यंत झालेल्या अपघातांमध्ये एक जुलैला झालेला विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात सर्वांत भीषण ठरला. त्यानंतर ट्रॅव्हल्स आणि समृद्धी महामार्ग, या दोहोंबद्दल ट्रॅव्हल्स संचालक आणि प्रवाशांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. जेथे दररोज ५० ते ६० ट्रॅव्हल्स धावत होत्या, तेथे आज केवळ १५ ते २० ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरून धावताना दिसतात. (Travel directors and passengers have panicked)

प्रवास करताना सुरक्षा महत्त्वाची. जीव धोक्यात घालून प्रवास कशाला करायचा, असा प्रश्न आता समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडला आहे. त्यामुळे प्रवाशांनी समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या ट्रॅव्हल्सकडे पाठ फिरविली आहे. याचा परिणाम सेवेवर झाला असून ७० टक्के ट्रॅव्हल्सची संख्या समृद्धीवर रोडावल्याचे वास्तव आहे. एक जुलैला विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला लागलेली आग अजूनही धगधगत असल्याचे दिसत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एक जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन २५ प्रवाशांच्या होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर नागपूर-पुणे असा प्रवास समृद्धी महामार्गावर करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर ट्रॅव्हल्स संचालकसुद्धा फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघातापूर्वी नागपुरातून रोज पुण्याकरिता ६० ट्रॅव्हल्स धावत होत्या. आता ही संख्या २० वर आली आहे.

आपला जुनाच मार्ग बरा..

समृद्धीवर नेहमी अपघाताच्या घटना होत असताना आधीच लोकांमध्ये भीती आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या घटनेने त्यात आणखी भर पडली. त्यामुळे प्रवासी समृद्धीऐवजी पूर्वीच्या नागपूर-छत्रपती संभाजीनगर-पुणे या जुन्याच मार्गाने धावणाऱ्या ट्रॅव्हल्सला पसंती देत आहे. समृद्धीवर सुपरफास्ट जाण्यापेक्षा थोडा वेळ लागला तरी चालेल, मात्र प्रवास सुरक्षित असायला हवा, असे प्रवाशांना वाटू लागले आहे. आता ट्रॅव्हल्स कंपन्यादेखील या मार्गावर धावायला फारशा उत्सुक नसल्याचे चित्र आहे.

शिक्षणासाठी माझे नेहमीच पुण्याला (Pune) जाणे असते. माझी पहिली पसंती रेल्वेलाच आहे. रेल्वेमध्ये तिकीट आरक्षण मिळाले नाही तर मी ट्रॅव्हल्सने जातो. समृद्धी मार्गावर ट्रॅव्हल्सच्या अपघातामुळे (Accident) मनात भीती निर्माण झाली आहे, असे (Nagpur) नागपूर-पुणे असा नियमित प्रवास करणारे प्रवासी अनमोल नगरारे यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर ट्रॅव्हल्सच्या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. आधी दरदिवशी नागपूर वरून ५० ते ६० ट्रॅव्हल्स धावत होत्या. आता हीच संख्या १५ ते २० वर आली असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT