Sand Ghat Sarkarnama
विदर्भ

Sand Mafia News : वाळू माफियांचा आतंक सुरूच; एसडीओंची गाडी उडवली, थोडक्यात बचावले अधिकारी !

Buldhana : शासकीय वाहनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना इजा झाली नाही.

सरकारनामा ब्यूरो

The government vehicle was hit hard from behind : वाळू टिप्परचा गाडीतून पाठलाग करणाऱ्या एस. डी. ओ. यांच्या सरकारी वाहनाला वाळू माफियाने पाठीमागून धडक देऊन जीवघेणा हल्ला केला. शासकीय वाहनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना इजा झाली नाही. पण वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. (A case has been registered against sand mafia in Andhera police)

काल (ता. सात जुलै) दुपारी सुरा ते सरंबा वाळू टिप्परचा पाठलाग करत असताना माफियाच्या गाडीने शासकीय वाहनाला मागून जोरदार धडक दिली. सदर प्रकरणात चौघा वाळू माफियांविरुद्ध अंढेरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अंढेरा पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड मंडळ अधिकारी तलाठी यांच्या समवेत अवैध वाळू टिप्परच्या शोध मोहिमेवर होते.

सरंबा फाट्यापासून काही अंतरावर त्यांना दोन विना नंबरचे टिप्पर वाळू वाहतूक करताना दिसून आल्याने त्यांनी पाठलाग केला. यावेळी सरकारी वाहनात एसडीओ गायकवाड, मंडळ धिकारी रवींद्र घुगे, तलाठी संदीप वायाळ, तलाठी नीलेश जाधव व चालक चव्हाण होते. एसडीएम यांचे सरकारी वाहन टिप्परचा पाठलाग करीत असल्याचे लक्षात आल्यावर सरंबा ते सुरा दरम्यान टिप्पर चालकांनी चालत्या वाहनातून वाळू रस्त्यावर हायड्रोलिक केली.

त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या बोलेरो जीप क्रमांक एम एच २८ सी ६७७७ ने वाळू टिप्परचा पाठलाग करणाऱ्या शासकीय वाहनाला मागून धडक दिली. त्यावेळी एसडीओ गायकवाड हे टिप्परचा पाठलाग करताना लाइव्ह व्हिडिओ घेत होते. पाठीमागून वाहनाने धडक दिल्याने शासकीय वाहनावरून चालकाचा ताबा सुटला. मात्र चालक चव्हाण यांनी लगेच वाहन कंट्रोल केले. यादरम्यान धडक देणारे वाहन भरधाव वेगाने पसार झाले.

अपघातातून (Accident) सावरत लगेच शासकीय वाहनाने मलकापूर पांगरापर्यंत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परचा पाठलाग केला. मात्र दोन्ही टिप्पर हाती लागले नाही. दरम्यान सरकारी कामात अडथळा निर्माण करून एसडीओ यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या वाळू माफियांच्या (Sand Mafiya) विरोधात अंढेरा पोलिसात फिर्याद नोंदविण्यात आली.

मंडळ अधिकारी रवींद्र घुगे यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी (Police) बोलेरो वाहनातील स्वप्नील पंढरी तळेकर वय २५ राहणार वाकद, बळिराम प्रकाश मुंडे वय २५ राहणार नारायणखेड, यांच्यासह पांढऱ्या रंगाची केबिन व करड्या रंगाचे ट्रॉली असलेला टिप्पर चालक, व पिवळा रंगाचा टिप्पर चालक अशा चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT