They are always prone to swear words : संजय राऊत यांच्या रक्तात शिवराळ भाषा आली आहे. तुरुंगात राहून आल्यामुळे त्यांना नेहमी अपशब्द सुचतात आणि ते तसेच बोलतात. त्यांच्या बोलण्याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मी उत्तर देणार नाही, तर नितेश राणे त्यांच्यावर प्रतिक्रिया देतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाल. (Neither Deputy Chief Minister Devendra Fadnavis nor I will answer)
आमदार बावनकुळे आज (ता. २६) सायंकाळी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत यांच्या विधानांना उत्तर देण्यासाठी आम्ही प्रवक्ते नेमले आहेत, ते उत्तरे देतील. अशा खालच्या भाषेत बोलणं म्हणजे नीचपणा आहे, ते संस्कार विसरले आहेत. त्यांच्या या रोजच्या नीचपणाला आम्ही उत्तर द्यावं, हे अपेक्षित नाही. अशा वक्तव्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडते, असे बावनकुळे म्हणाले.
आमच्या नेत्यांबद्दल तुम्ही नेहमी सतत अपशब्द बोलाल, तर कधीतरी आमचा संयम सुटेल. उद्धव ठाकरे यांनी युतीच्या काळातला आपला इतिहास आणि ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल काय बोलायचे, ते आठवावे. आमच्या संयमाचा बांध तुम्ही तोडू नका. नाहीतर आमच्याकडूनही कोणीतरी अशीच भाषा वापरेल. पण आम्ही अजूनही संयम ठेऊन आहोत. कारण महाराष्ट्राची संस्कृती पाळली गेली पाहिजे.
उद्धव ठाकरे यू टर्न घेत आहेत..
संजय राऊतांचा (Sanjay Raut) उपाय लोकच करणार आहेत. मतदानाच्या माध्यमातून संजय राऊत यांना जनता उत्तर देईल. बारसूच्या प्रकल्पाबद्दल विचारले असता, बारसूचा प्रकल्प हा सरकारी प्रकल्प आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा उद्योगमंत्री बोलतील. मात्र हे खरं आहे की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा प्रकल्प बारसूला यावा, रिफायनरी बारसूला व्हावी, यासाठी पत्र दिले होते आणि केंद्र सरकारने तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. आता ते यू टर्न घेत आहेत, असे आमदार बावनकुळेंनी सांगितले.
मुख्यमंत्री होण्यासाठी पोस्टर नाही, तर बहुमत लागतं..
महाराष्ट्राच्या (Maharashtra) मुख्यमंत्रिपदाबद्दल बॅनरबाजी होत आहे. याबाबत विचारले असता आमदार बावनकुळे म्हणाले, प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला वाटत असतं की आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार यांचे तर काँग्रेसमधून नाना पटोले अशा नेत्यांचे पोस्टर्स लागत असतात. काल मिरा-भाईंदरमध्येही उद्धव ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले होते. मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी पोस्टर नाही, तर बहुमत लागतं, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.