Chandrashekhar Bawankule Sanjay Raut  sarkarnama
विदर्भ

Phone Tapping Case: खासदार संजय राऊतांची मोठी मागणी; म्हणाले,फोन टॅपिंगप्रकरणी मंत्री बावनकुळेंवर गुन्हा दाखल करा

Shivsena Vs BJP : भाजप नेते महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वत:च्याच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना फोन टॅपिंगची धमकी देत आहेत. हा गंभीर गुन्हा असून त्यांनी फोन टॅपिंग करतो अशी कबुलीच दिली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: भाजप नेते महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वत:च्याच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना फोन टॅपिंगची धमकी देत आहेत. हा गंभीर गुन्हा असून त्यांनी फोन टॅपिंग करतो अशी कबुलीच दिली आहे. बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर इंडियन टेलिग्राफ ॲक्टखाली गुन्हा नोंदवून त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना बजावताना भाजप पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याने बेईमानी केली तर याद राखा, सर्वांचे फोन सर्व्हिलन्सवर टाकलेले असून तुम्ही व्हॉटस् ॲपवर कोणाशी काय बोलता, कोणाशी काय संवाद साधता हे सर्व आम्हाला कळते, असा इशारा दिला होता. यावरून राऊत यांनी निशाणा साधला.

ते म्हणाले, की हा विषय फक्त भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संबंधित नसून विरोधी पक्षाचे फोनही टॅप करून ऐकले जात आहेत. त्यांचे व्हाटस् ॲप पाहिले जात आहे, हे आता चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

विरोधी पक्षाचे, स्वत:च्या कार्यकर्त्यांचे, सहकारी पक्षाचे फोन टॅप करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. फोन टॅपिंगमध्ये पत्रकार, फडणवीसविरोधी गटाचे, शिंदे गट, अजित पवार गट, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस नेते आणि मी सुद्धा असेन. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही फोन टॅप करीत असतील, कारण शहा हे फडणवीस यांच्याविरोधात आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.

पेगॅससपेक्षा अद्ययावत मशीन

संजय राऊत म्हणाले, की बावनकुळे आणि त्यांच्या टीमने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईतील काही विकसक, नागपूर व पुणे येथे फोन टॅप करण्याचे मशीन लावले आहेत. त्याला ते वॉररूम बोलत आहेत.

हे भाजपचे खासगी दक्षता कार्यालय असून तेथून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अशा सर्व पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे, असा आरोप करत तेथे पेगॅससपेक्षा अद्ययावत मशीन आहेत, असाही आरोप राऊत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT