Ambadas Danve and Abdul Sattar Sarkarnama
विदर्भ

Ambadas Danve News: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये नवीन ते काय, असं म्हणणाऱ्या सत्तारांनी राजीनामा द्यावा !

Government : तरीही सरकार त्याबद्दल बोलायला तयार नाही.

सरकारनामा ब्यूरो

Ambadas Danve said, Agriculture Minister should resign : परवा परवा झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यावर कृषिमंत्र्यांनी जे उत्तर दिले, त्यावरून हे सरकार असंवेदनशील आहे, असे सांगत कृषिमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

यासंदर्भात दानवे म्हणाले, विमा कंपन्या चुकीचा सर्वे करतात. नाशिक जिल्ह्यातील मालवाडी नावाचे गाव लोकांनी विकायला काढले आहे. कारण त्या गावात नैसर्गिक आपत्तीमुळे आता काहीच उरलेले नाही. तरीही सरकार त्याबद्दल बोलायला तयार नाही. मोसंबीवर प्रक्रियेची घोषणा केली सरकारने केली होती, त्याचे पुढे काहीच झाले नाही. विम्याचे हप्ते शेतकऱ्यांना मिळाले नाही. सरकारचा कृषी विभाग शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.

पीक विम्यावर सातत्याने आम्ही सभागृहात बोलत आहो. दोन रुपये ४०० रुपये अन् ६०० रुपये काही शेतकऱ्यांना मिळाले आहे. सरकारने एक रुपयात विमा घोषित केला. पण मिळणार का, हा प्रश्‍न आहे. दीड दोन महिने झाले पैसे येऊनही कंपन्या शेतकऱ्यांना देत नाही. नाफेडकडून कांदा खरेदी करणार असे सांगितले. काल मुख्यमंत्री म्हणाले की कांद्याला ३०० रुपये भाव देणार. एका ट्रकचे भाडे तीन ते चार हजार रुपये आहे. ३०० रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार आहे.

ही परिस्थिती सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठीही चांगली नाही. पर्जन्यमापक यंत्र असे लावले की पर्जन्य विभाग आणि कृषी विभागाची त्यात मिलीभगत आहे का, असा प्रश्‍न पडतो. स्कायमॅट कंपनी रेनगेज वाढवली पाहिजे. मंडळात एक असेल तर तीन करा. पर्जन्यमापक यंत्र स्थिती आणि तपासणी सातत्याने होण्याची गरज आहे.

गेल्या वर्षभरात चार वेळा अतिवृष्टी झाली. नागपूरच्या अधिवेशनात सरकारने घोषणा केली होती की, ३७०० कोटी जाहीर देणार. त्यांपैकी किती कोटी रुपये शेतकऱ्यांना पोहोचवले, याचे उत्तर अद्याप दिले नाही. गतिमान सरकार म्हणून जाहिरात येते. गती कुठे आहे, असा सवाल करीत ११०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती दानवेंनी दिली. परवाच्या अवकाळी पावसानंतरही आत्महत्या झाल्याचे त्यांनी सांगितले.

मागेल त्याला शेततळे योजनेचे काय झाले? जलयुक्तमध्ये शिवारमधील घोटाळ्यांचे काय झाले. मागच्या काळातील चौकश्या होत्या, त्या खोट्या होत्या का, असा सवाल करीत त्या चौकश्‍या झाल्या पाहिजे. महानंदावर ही स्थिती का आली. अमूल आपल्याकडे स्वस्त आहे. गुजरातमध्ये (Gujrat) महाग आहे. आपल्या कंपन्या त्यांना गिळंकृत करायच्या आहे.

अमूलसारख्या कंपन्या आपल्या डोक्यावर बसणार. महानंदामार्फत राज्यभरातील (Maharashtra) दूध एकत्र करत होत होते. महानंदा बंद होण्याची वेळ का आली. आता ९०० कर्मचारी रस्त्यावर आले नाही पाहिजे. शेतकऱ्याच्या (Farmers) दुधाला भाव देण्याची गरज आहे. शहरात भाव वाढतात. पण ग्रामीणमध्ये वाढत नाही, यावर सरकार कधी गंभीर होणार, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT