Nagpur Zilla Parishad reservation draw sarkarnama
विदर्भ

Nagpur Congress Politics : झेडपीच्या आरक्षणाने नागपुरात तगडी फाईट, दोन्ही माजी महिला अध्यक्षांचे सर्कल झाले खुले, काँग्रेस पुन्हा संधी देणार का?

Nagpur Zilla Parishad reservation draw : राज्यातील जिल्हा परिषदांच्या सभापतींच्या आरक्षणानंतर आता जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांचे देखील आरक्षण आज जाहीर झाले. या आरक्षणामुळे चांदा ते बांदा आता खळबळ उडाली आहे.

Rajesh Charpe

  1. नागपूर जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत महिला आणि अनुसूचित जातीच्या जागांमुळे अनेक दिग्गजांचे सर्कल आरक्षित झाले.

  2. दोन माजी महिला अध्यक्षांचे सर्कल खुले झाल्याने त्यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.

  3. काँग्रेस या सर्कलमधून नवे चेहरे उतरवते की माजी अध्यक्षांना संधी देते यावर सर्वांचे लक्ष आहे.

नागपूर : नागपूर जिल्हा परिषद सर्कल आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. महिला आणि अनुसूचित जातीच्या राखीव जागांमुळे अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या दोन माजी महिला अध्यक्षांचे सर्कल मात्र सर्वांसाठी खुले झाले आहे. हे दोन्ही सर्कल मागील निवडणुकीत एससी आणि एसटीसाठी राखीव होते. ते खुले झाल्याने आता काँग्रेस या सर्कलमधून कोणाला लढवते की पुन्हा माजी अध्यक्षांना संधी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रश्मी बर्वे या एससीसाठी राखीव असलेल्या टेकाडी सर्कलमधून निवडून आल्या होत्या. त्यांना अडीच वर्ष नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. त्यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. याशिवाय एबी फॉर्मही त्यांना देण्यात आला होता.

मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला. तसेच न्यायालयात याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. दरम्यान, जात पडताळणी समितीने त्यांच्या जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे निर्णय दिला होता. रामेटक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता होती.

याचा अंदाज काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना आधीच आला. विरोधकांचे हे डावपेच असल्याचे बघून त्यांनी रश्मी बर्वे यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली. ते मोठ्या फरकाने निवडून आले. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांचा त्यांनी पराभव केला.

रामटेक लोकसभा मतदारंसघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातून त्यांना मताधिक्य मिळाले. यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याही विधानसभा मतदारंसघांचा समावेश आहे.

रश्मी बर्वे यांच्यानंतर काँग्रेसने अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या पाटणसावंगी सर्कलमधून निवडून आलेल्या मुक्ता कोकडे यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या खुर्चीवर बसवले. त्यांचे सर्कल सुनील केदार यांच्या विधानसभा मतदारसंघात येते. केदारांच्याच त्या समर्थक आहेत. त्यांचेही सर्कल आता सर्वांसाठी खुले झाले आहेत.

दोन्ही माजी अध्यक्षांच्या सर्कल लढण्यासाठी सर्वांना खुले असल्याने इच्छुकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. हे बघता आता खुल्या प्रवर्गातून काँग्रेस कोणा नव्याला संधी देतं की माजी अध्यक्षांनाच रिपिट करतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

FAQs :

प्र.१: नागपूर जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत किती सर्कल खुल्या झाल्या आहेत?
👉 दोन माजी महिला अध्यक्षांचे सर्कल या वेळी सर्वांसाठी खुले झाले आहेत.

प्र.२: या आरक्षण सोडतीत कोणाला फटका बसला आहे?
👉 महिला आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणामुळे अनेक दिग्गज उमेदवारांचे सर्कल आरक्षित झाल्याने त्यांना फटका बसला आहे.

प्र.३: काँग्रेस आता कोणाला उमेदवारी देणार?
👉 काँग्रेस या सर्कलमधून नवे चेहरे उतरवते की माजी अध्यक्षांना संधी देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

प्र.४: मागील निवडणुकीत या सर्कलचे आरक्षण काय होते?
👉 मागील निवडणुकीत ही सर्कल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव होती.

प्र.५: या आरक्षणामुळे नागपूरच्या राजकारणावर काय परिणाम होणार?
👉 नव्या आरक्षणामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT