Sharad Pawar  sarkarnama
विदर्भ

शरद पवार उद्या नागपुरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जय्यत तयारी...

साडेपाच वाजता वर्धमान नगर Wardhaman Nagar येथील सात वचन लॉन येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा NCP Workers मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उद्या बुधवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून यासंदर्भात सोमवारी शहर राष्ट्रवादीच्यावतीने सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.

शरद पवार चार्टर्ड विमानाने नागपूरला येत आहेत. बुधवारी दुपारी तीन वाजता शहरातील व्यावसायिकांसोबत ते रामदास पेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे चर्चा करतील. त्यानंतर साडेचार वाजता येथेच ते पत्रकारांना संबोधित करतील. साडेपाच वाजता वर्धमान नगर येथील सात वचन लॉन येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शरद पवार विदर्भ दौऱ्यात गडचिरोली, वडसा, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत.

शरद पवार यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सोमवारी गणेशपेठेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रदेश आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला नागपूर जिल्ह्याचे निरीक्षक माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते. पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्याची सूचना त्यांनी दिली, असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपूर्वी शरद पवार तीन दिवस विदर्भात होते. त्यावेळी त्यांनी अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला होता. या दौऱ्यात त्यांच्या गाडीचे सारथ्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. त्यानंतर सुमारे दोन वर्षानंतर शरद पवार विदर्भात येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या सर्वेक्षणाचे विषय काय असतील आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते विदर्भातील कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतील, याची उत्सुकता लागलेली आहे.

शरद पवार यांच्या दोन वर्षांपूर्वीच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले होते. सध्या विदर्भाची परिस्थिती तेवढी चांगली नाही. अमरावती, अकोट आणि काही जिल्ह्यांमध्ये दंगलसदृश स्थिती आहे. अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सिमेवर झालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवादी मारले गेले. त्या धर्तीवर नागपुरातही जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पवारांच्या या विदर्भ दौऱ्यानंतर महाराष्ट्रात काय स्थित्यंतरे येतील, याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहे. जमावबंदी आदेशामुळे कार्यकर्ता मेळाव्यात अडचणी येऊ नये, यासाठीही स्थानिक नेते प्रयत्नांत दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT