Babanrao Taywade- Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar On OBC : शरद पवारांच्या आरक्षणाच्या भूमिकेवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे लक्ष !

OBC Reservation : सर्वांच्या संमतीने यापूर्वी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा हट्ट धरला आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसही विरोधकांनाही चांगलेच अडचणीत टाकले आहे. या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे.

यावर ज्येष्ठ नेते शरद पवार काय सल्ला देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघसुद्धा याकडे नजर रोखून असून ओबीसींच्या संरक्षणासाठी आम्ही सज्ज असल्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणावर अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. सरकारने मराठा समाजाला ओबीसी (OBC) कोट्यातून आरक्षण द्यायचे का यावर विचारविमर्श करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. हा अडचणीची मुद्दा असल्याने विरोधकांनी बैठकीपासून लांब राहणे पसंत केले. कोणा एकाची बाजू घेतली तरी विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसू शकतो असे राजकीय गणित यामागे आहे. दरम्यान, या संदर्भात अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सर्वांना आणखीच बुचकाळ्यात टाकले आहे.

याबाबत विचारणा केली असता बबनराव तायवाडे म्हणाले, शरद पवार यांच्या भूमिकेकडे आम्हीसुद्धा लक्ष ठेवून आहोत.सर्वांच्या संमतीने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जरांगे पाटील यांचा ओबीसी समाजातून आरक्षण देण्याचा हट्ट धरला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी यापूर्वीच 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल केल्याशिवाय हे शक्य होणार नसल्याचे म्हटले आहे.त्यांनाही तांत्रिक अडचण माहिती आहे.अन्यथा त्यांनी योग्य तो सल्ला दिलाच असता. आम्हीसुद्धा ओबीसीच्या संविधानिक भूमिकेचा रक्षण करण्यासाठी सज्ज आहोत.जोपर्यंत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल केली जात नाही तोपर्यंत यावर तोडगा निघेल असे वाटत नसल्याचे तायवाडे यांनी सांगितले.

राजकीय लोकांसारखी शरद पवार यांच्यावर सामाजिक क्षेत्रातील लोकांनी टिपणी करणे योग्य वाटत नाही. पुढारी आज एक बोलतात उद्या दुसले. ओबीसींच्या संविधानिक अधिकाराचे रक्षण करणे हाच आमचा अजेंडा आहे. तिसऱ्या आघाडीच्या संदर्भात अण्णा शेंडगे यांच्या वक्तव्यावर बोलणेही उचित होणार नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघ राजकीय संघटना नाही असेही तायवाडे यांनी स्पष्ट केले. हे बघता सरकारने आरक्षणाबाबत कुठलाही निर्णय घेतला तरी मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष अटळ असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT