Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar : आता काय करायचं! एकाच मतदारसंघासाठी वडील अन् मुलानं दिली मुलाखत; शरद पवार कोणाला उमेदवारी देणार?

Sharad Pawar Politics : शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत बाप-बेटे सहभागी झाले होते. येथून जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांच्यासह एकूण पाच जणांनी येथील जागेवर दावे केले आहेत.

Rashmi Mane

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघावर माजी मंत्री रमेशचंद्र बंग आणि त्यांचे पुत्र, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग या दोघांनी दावा केला आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत बाप-बेटे सहभागी झाले होते. येथून जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांच्यासह एकूण पाच जणांनी येथील जागेवर दावे केले आहेत.

हिंगणा मतदारसंघातून रमेशचंद्र बंग (Ramesh Bang) यापूर्वी दोन वेळा निवडून आले होते. आघाडीच्या कार्यकाळात ते अन्न व नागरी पुरवठामंत्री होते. त्यानंतर त्यांचा भाजपचे विजय घोडमारे यांनी पराभव केला. नंतर पुन्हा एकदा त्यांनी नशीब अजमावून बघितले. मात्र भाजपचे समीर मेघे यांनी पुन्हा त्यांचा पराभव केला. 2019 च्या निवडणुकीत आपला परंपरागत मतदारसंघावरचा बंग यांनी दावा सोडला. विजय घोडमारे यांना पक्षात आणून उमेदवार केले. मात्र राष्ट्रवादीच्या वाट्याला विजय आला नाही. दरम्यान लोकसभेची निवडणूक काँग्रेसने जिंकली. सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिसत असल्याने रमेशचंद्र बंग यांनी पुन्हा कंबर कसली आहे. त्यांचे पुत्र दिनेश बंग हे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत आमदार समीर मेघे (Samir Meghe) आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्यात एका वक्तव्यावरून चांगलेच वैर निर्माण झाले आहे. केदारांनी उघडपणे मेघे यांना चॅलेंज केले आहे. हे बघता केदार आपली संपूर्ण ताकद महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे उभी करणार असल्याचे दिसून येते. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकत्रित काम करताना दिसत आहे.

आमदार मेघे यांनी केलेल्या बोगस मतदारांची नावे त्यांनी शोधून काढली आहे. या विरोधात न्यायालयात देखील दाद मागितली आहे. त्यानुसार सुमारे 19 हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे. आमदार मेघे यांच्या कॉलेजीमधील कर्मचारी, विद्यार्थी तसेच वर्धा जिल्ह्यातील मतदारांची नावेही वगळण्याची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आली आहे. अशा पद्धतीने दोन्ही काँग्रेसने आमदार मेघे यांच्यावर दबाव वाढवण्यात आला आहे. आता फक्त बाप-बेट्यापैकी कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT