Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar : शरद पवार म्हणाले, मुस्लीम बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करेन...

काय तोडगा निघू शकतो, उपाययोजना काय करायच्या याच्यावर विचार करून दोन ते ती आठवड्यांनी पुन्हा येईन तेव्हा आपण सविस्तर चर्चा करू, असे पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.

Atul Mehere

नागपूर : विदर्भ (Vidarbha) मुस्लीम इंटलॲक्चुअल फोरमच्या मंचावर ॲड. फिरदोस मिर्झा यांनी आज अल्पसंख्य मुस्लीम समाजातील समस्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे मांडल्या. केवळ मते घेण्यासाठीच आमचा वापर केला जातो, असा आरोपही त्यांनी केला. त्यावर अल्पसंख्यांकांमध्येच या समस्या नाहीत तर अल्पसंख्यांकांमधील इतर धर्मीयांनाही असे प्रश्‍न भेडसावतात, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

फोरमच्या मंचावर फिरदोस मिर्झा, राजा बेग, परवेझ सिद्दीकी, डॉ. अजीज खान आणि डॉ. शकील सत्तार आणि आमदार सुनील केदार (MLA Sunill Kedar) उपस्थित होते. फोरमच्या सदस्यांनी मांडलेल्या समस्यांवर बोलताना पवार म्हणाले, मी नागपुरात आल्यावर फोरमच्या सदस्यांना आपल्यासोबत चर्चा करायची आहे, असे मला सांगण्यात आले. तेव्हा २० ते २५ लोकांसोबत बैठक असेल, असे समजून मी आलो. पण येथे तर हॉल खचाखच भरला आहे. त्यामुळे येथे चर्चा नाही होऊ शकणार.

आज तुमचे सर्व प्रश्‍न ऐकून, समजून घेतले. त्याच्यावर काय तोडगा निघू शकतो, उपाययोजना काय करायच्या याच्यावर विचार करून दोन ते ती आठवड्यांनी पुन्हा येईन तेव्हा आपण सविस्तर चर्चा करू, असे पवार यांनी सांगितले. कारण केवळ अर्ध्या-एक तासात ही चर्चा होऊ शकत नाही आणि आता लगेच माझा दुसरा कार्यक्रम आहे. तुमचे प्रश्‍न ऐकल्यानंतर असे वाटले की मी येथे निवडणुकीसाठी मते मागायला आलो आहे. पण त्यासाठी मी आलेलो नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

तुम्ही मांडलेल्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मी पुढच्या वेळी जेव्हा येईन, तेव्हा सविस्तर चर्चा करू आणि तुमच्या खांद्याला खांदा लाऊन काम करेन. राजकीय पक्ष मुस्लिमांना प्रतिनिधित्व देत नाही हा तुमचा आरोप आहे. इतर पक्षांचे मला माहिती नाही. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यात ४० ते ५० आमदार आहेत. केंद्र सरकारमध्ये आमचे ८ जण आहेत. त्यांपैकी दोघे मुस्लीम आहेत. त्यातही एक महिला आहेत फौजिया खान आणि उपराष्ट्रपतींनी फौजिया खान यांचे विशेष कौतुक केले आहे.

मुस्लीम समाजाच्या प्रश्‍नांवर ३ ते ४ सेक्शनमध्ये चर्चा होऊ शकते. लोकसंख्येत मोठा वाटा असूनही समाजाला हव्या त्या सुविधा मिळत नसतील, तर ही काळजीची बाब आहे. अल्पसंख्यांकांमध्ये फक्त मुस्लीम आणि महाराष्ट्रातच समस्या नाहीत, तर इतर राज्यांमध्येही काहीशी अशीच स्थिती आहे. उदाहरण केरळचे देता येईल. उर्दू चांगली भाषा आहे. आजही देशातील ९१ ते ९४ टक्के लोक देशाच्या भाषेला प्राधान्य देतात. बहुसंख्या मुस्लीम समाज लहान मोठ्या व्यवसायात आहे. त्यामुळेही शिक्षणाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता शरद पवार यांनी वर्तवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT