Amravati : 'राजकारणात काहीही शक्य आहे. अशक्य काहीही नाही,' असे सांगत आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मोठे राजकीय भाकीत केलं आहे. "येत्या १५ दिवसांत नक्की चमत्कार होईल अन् शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. राज्यात आणि केंद्रात मोदी सरकार मजबूत होऊन विकास होईल,"असे राणा म्हणाले.
पवारांनी मोदींना पाठिंबा द्यायला पाहिजे, यासाठी लालबाग राजाला साकडं घातलं असल्याचे राणांनी स्पष्ट केलं. "राज्यात देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. अजित पवार विरोधी पक्षनेतावरून उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे अजित पवारसुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतील, राजकारणात काहीही शक्य आहे," असे सूचक विधान आमदार रवी राणांनी केले आहे.
रवी राणा म्हणाले, 'आठ दिवसांपूर्वी मुंबईला लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलो. तेव्हा लालबागच्या राजाकडे मागितलं की, देशात पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे काम सुरू आहे, त्यांचं काम पाहून अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यांनी केंद्रातही देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला आहे. शरद पवारांनी केंद्र आणि राज्यात सरकारला पाठिंबा द्यायला पाहिजे, असं साकडं लालबागच्या राजाला घातलं आहे,"
अमरावतीत गणेश विसर्जनानंतर पत्रकारांशी आमदार रवी राणा यांनी संवाद साधला. राणांच्या या विधानाने राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांनी बुधवारी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांच्या कार्यकर्त्याने गणरायाच्या चरणी ठेवलेल्या चिठ्ठीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अजितदादांसोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे, कार्यकर्ते होते.
अजितदादांनी लालबाग राजांच्या चरणी नारळाचे तोरण वाहिलं. या वेळी एका कार्यकर्त्याने गणरायाच्या चरणी एक चिठ्ठी ठेवली. रणजित नरोटे यांनी या चिठ्ठीत 'हे लालबागच्या राजा आमचे अजितदादा पवार लवकरात लवकर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे' असा मजकूर लिहिला आहे. राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत या चिठ्ठीमुळे अजितदादा मुख्यमंत्री होणार, या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.