Shegaon APMC Sarkarnama
विदर्भ

Shegaon APMC Election Result : शेगावात पाटील ठरले सहकारातील ‘दादा’, भाजपचा केला सुपडा साफ !

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केले.

सरकारनामा ब्यूरो

Buldhana District's Shegaon APMC Election Result News : येथील बाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकार नेते पांडुरंगदादा पाटील व काँगेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने सर्व १८ जागा मिळवून बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. गत कित्‍येक वर्षापासून सहकार पॅनलची 'दादागिरी' निर्विवाद राहिली आहे. (The 'bullying' of the Cooperative Panel remains undisputed)

काटे की टक्‍कर वाटत असलेल्‍या या निवडणुकीत भाजप, शिंदे गट व वंचितने मिळून निवडणुकीत उतरवलेल्‍या शेतकरी पॅनलचा सुपडा साफ झाला असून, त्‍यांनी एकही जागा मिळविता आली नाही. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे व खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्यासह शेगावच्या भाजप व शिंदे (Eknath Shinde) गटाच्या दिग्गजांनी शेतकरी पॅनलद्वारे ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

सहकार नेते पांडुरंगदादा पाटील व ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी विरोधकांचे सर्व डावपेच हाणून पाडत आपणच सहकारातले 'दादा' असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे शेगाव (Shegaon) बाजार समितीवर (APMC Election) सहकार पॅनलचीच 'दादागिरी' प्रथापित झाली असून, मतदारसंघात सत्‍ता असलेल्‍या भाजपसाठी (BJP) हा मोठा धक्‍का आहे.

ईश्वर चिठ्ठीनेही दिली सहकारला साथ..

व्यापारी मतदार संघात शेतकरी (Farmers) पॅनलच्या लता देशमुख व सहकारचे रितेश टेकडीवील यांना समान ३५ मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठी काढण्यात आली. यामध्येही भाग्‍याने रितेश टेकडीवील यांनाच कौल दिला.

विजयी उमेदवार व मिळालेली मते

श्रीधर पांडुरंग पाटील २५७, गोपाळ वामनराव मिरगे २४१, तेजराव भिमराव दही २४२, रमेश मनोहर पाटील २३८, दादाराव साहेबराव निळे २३७, योगेश एकनाथ धारकर २३४, परमेश्वर विष्नु हिंगणे २३०, मित्रवृंदा श्रीधर पुंडकर २४६, अर्चना संजय शेळके २४१, संतोष श्रीकृष्ण भारसाकळे २५७, वासुदेव किसन धुमाळे २३८ मते घेऊन विजयी झाले.

ग्रापंचायत गटातून सुरेश नामदेव उन्हाळे २०८, श्रीकांत सुखदेव तायडे ३९७, संजय गव्हांदे २१८ अमोल लांजुळकर २१३ विजयी झाले. व्यापारी अडते गटातून विठ्ठल गजानन पाटील ५०, रितेश ओमप्रकाश टेकडीवाल ३५. हमाल मापारी गटातून गुलाब खान भुरे खान १०० मते घेऊन विजयी झाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT