chandrashekhar bawankule
chandrashekhar bawankule Sarkarnama
विदर्भ

हनुमान चालिसा पठणासाठी माझ्या घरी या : भाजप नेत्याचे शिवसैनिकांना आवतण

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : 'मातोश्री'वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने घेतली होती. मात्र बराच गदारोळ झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मागे घेतली. अखेर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी (ता. २४ एप्रिल) अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   या प्रकरणाच्या विरोधात राज्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी शिवसेनेचा (shivsena) समाचार घेतला आहे. ‘हनुमान चालिसा पठणासाठी शिवसेनेने माझ्या घरी यावे, मी त्यांना विरोध न करता त्यांचे स्वागतच करीन’ असे आवाहन आमदार बावनकुळे यांनी शिवसैनिकांना दिले. (Shiv Sainiks should come my house to reade Hanuman Chalisa : chandrashekhar-bawankule)

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि राणा दाम्पत्याच्या विरोधातील कारवाईचा निषेध करताना आमदार चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. शिवसेनेला राणा दाम्पत्याचा इतका विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते. हनुमान चालिसा पठणासाठी एक तंबू त्यांच्यासाठी बांधला असता, चहापाण्याची अन् प्रसादाची व्यवस्था केली असती तरी पुरे झाले असते, असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.

माझ्या घरी जर कुणी हनुमान चालिसा पठणासाठी आले, तर त्यांना मी टाळ मृदंग देईल, लाडवाचा प्रसाद आणि जेवणाची सोय करील,  असेही बावनकुळे म्हणाले.   हनुमान चालिसा पठणात राजकीय पक्ष महत्वाचा नाही. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष. दोन्ही कार्यकर्त्यांचे माझ्या घरी स्वागतच होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरी हनुमान चालिसा पठणासाठी जरूर यावे. माझ्या घरात त्यांचे आदरतिथ्य होईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

महाआघाडी सरकार ब्रिटिशांपेक्षा अधिक जुलमी

किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा असताना त्यांच्यावर दगडफेक होते, हे बरे नाही. त्यांच्यावरील हल्लेखोरांना पोलिसांचा अलिखित पाठिंबा मिळतो आहे. महाविकास आघाडी सरकार ब्रिटिशांपेक्षा  अधिक जुलमी सरकार असून प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT