<div class="paragraphs"><p>Sanjay Rathore and Nitin Bhutada</p></div>

Sanjay Rathore and Nitin Bhutada

 

Sarkarnama

विदर्भ

शिवसेनेने विचारधारा सोडली : भाजपची संजय राठोडांवर सडकून टिका…

सरकारनामा ब्यूरो

संजय राठोड

यवतमाळ : माजी मंत्री, आमदार संजय राठोड (Sanjay Rathore) ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, त्या पक्षाची सुरूवातच एका विचारधारेने झाली होती. पण आता शिवसेनेने (Shiv Sena) विचारधारा सोडली आहे. मतविभाजन करण्यासाठी ते अशा पद्धतीने घटना घडवीत असल्याची टिका भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा यांनी केली.

उमरखेडमध्ये शुक्रवारी रात्री एका समुदायाच्या विरोधात काही तरुणांनी व्हिडिओ तयार करून तो सोशल मिडियावर अपलोड केला. त्यानंतर तेथे मोठा तणाव निर्माण झाला होता. आमदार संजय राठोड परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तेथे गेले असता त्यांनी ही घटना घडवण्यात भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना भूतडा आज माध्यमांशी बोलत होते.

उमरखेड शहरात काही समाजकंटकांनी केलेल्या जाळपोळ करून गाड्या फोडल्याच्या निषेधार्थ उमरखेड शहर आज सकाळपासून बंद करण्यात आले होते. शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी उमरखेड शहराला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर राठोड यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली होती. दरम्यान दुपारी साडेतीन वाजता व्यापाऱ्यांनी उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना तात्काळ अटक करून त्यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी लावून धरली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा यांनी शिवसेनेचे माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केली.

या घटनेतील आरोपींना तात्काळ अट करून त्यांची संपत्ती जप्त करावी आणि तोडफोड करून झालेल्या नुकसानाची भरपाई करावी, अशीही मागणी भूतडा यांनी केली आहे. अशा घटना भाजप घडवीत असल्याचा आरोप संजय राठोड यांनी केला आहे, हे वक्तव्य त्यांनी नैराश्‍यातून केले असल्याचेही ते म्हणाले. या घटनेनंतर आता शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

काय म्हणाले होते संजय राठोड?

उमरखेडमध्ये घडलेली घटना पूर्वनियोजित आहे. या घटनेच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. एका समुदायाच्या दैवतावर सोशल मिडियातून वाईट टिका करण्यात आली. त्यानंतर त्या समुदायातील तरुण मंडळी बाहेर पडली आणि शहरात तोडफोड सुरू केली. त्या गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. त्यांना अटक करून कठोर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची आहे आणि आमचीही तीच भूमिका आहे, असे आमदार राठोड म्हणाले.

अमरावतीमध्ये जे घडले, त्यामागे कोण होते, याचा शोध घेणे जितके गरजेचे आहे तेवढेच गंभीर उमरखेडचे प्रकरण आहे. अशा प्रकारे भावनांना हात घालून, लोकांची माथी फडकवणे आणि त्यानंतर निवडणुकांना सामोरे जाणे, ही कुणाची कार्यपद्धती आहे, हे तपासले पाहिजे. या घटनेमागे कोण आहे, खरा सूत्रधार कोण, याचाही तपास मुळाशी जाऊन करणार आहो, असेही आमदार संजय राठोड म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT