Nitin Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Nitin Deshmukh : पंतप्रधान मोदींच्या फोटोमुळे शिवसेनेला तोटाच; नितीन देशमुखांनी मांडलं गणित

Nagpur MVA News : देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली टीका

सरकारनामा ब्युरो

Nitin Deshmukh Speech in Nagpur : आमदार नितीन देशमुख हे गुवाहटीला जाऊन परत आलेले आहेत. त्यांना आजच्या नागपूर येथील महाविकास आघाडीच्या सभेत बोलण्याची संधी दिली आहे. ते वज्रमूठ सभेत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सभेत त्यांनी राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

देशमुख म्हणाले, शिंदे-फडणवीस (State Government) सरकार ईडीच्या अशिर्वादने आले आहे. ते कसे आले हे सर्वात जास्त मला माहीत आहे. भाजपने लावलेल्या ईडीच्या चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे हे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडली. भाजपकडून सुरू असलेल्या ईडीच्या धोरणामुळे आशिया खंडात महाराष्ट्राची बदनाम झाली. त्या ४० आमदारांना गद्दार म्हणून ओळखले जाऊ लागेल. हा भाजपने (BJP) राज्याच्या प्रतिमेवर लावलेला कलंक आहे."

२०१९ मध्ये भाजपमुळे शिवसेनेचे आमदार निवडून आले असे भाजपसह ते ४० आमदारही म्हणतात. मात्र भाजपमुळे शिवसेनेच्या आमदारांची संख्या घटल्याचा दावा यावेळी देशमुखांनी केला. नितीन देशमुख (Nitin Deshmukh) म्हणाले, "भाजपसह ते ४० आमदारही म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोमुळे निवडून आलोय. दरम्यान २०१४ ला स्वतंत्रपणे लढलेल्या शिवसेनेचे ६३ आमदार होते. तेच युतीमध्ये २०१९ मध्ये ५६ झाले. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा (Narendra Modi) फोटोमुळे शिवसेनेला तोटाच झाला आहे."

देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विकासाशी नाही तर फक्त सत्तेशी बांधलकी असल्याची टीका केली. सत्ताधारी काहीही कारण काढून गुन्हे दाखल करत असल्याचा आरोपही देशमुख यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीत मंजूर केलेल्या निधीला स्थिगिती दिल्याने अकोला जिल्ह्यातील पाणी योजना अपूर्ण राहिली आहे. मंदिरासाठींचा निधी रोखला गेल्याचाही आरोप देखमुख यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT