Gangadhar Nakade and Satish Itkelwar, Nagpu
Gangadhar Nakade and Satish Itkelwar, Nagpu Sarkarnama
विदर्भ

Shivsena News: शिवसेनेच्या गंगाधर नाकाडेंची माघार, इटकेलवारांचे तत्काळ निलंबन !

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Graduate Constituency Election : नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल गेला होता. पण काही वेगवान घडामोडींनंतर त्यांना माघार घ्यावी लागली. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मातोश्रीवरून कॉल आल्यानंतर त्यांनी शेवटच्या क्षणी हा निर्णय घेतला. दरम्यान इटकेलवारांचे तत्काळ निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे.

गंगाधर नाकाडे यांनी सहा महिन्यांपासून तयारी केली होती. पण आता शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतली आहे. गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक सेनेचा मी विभागीय अध्यक्ष आहे. शिवसेनेच्या (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष अभ्यंकर यांचा मला कॉल आला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितला. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी सांगतील, त्या उमेदवाराचे काम आम्ही आता करू. या घडामोडींमुळे आमचा हिरमोड नक्कीच झाला आहे, असे नाकाडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सांगितले.

गेल्या पाच वर्षांत आम्ही शिक्षकांसाठी भरपूर काम केले. कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले होते. संघटना चांगल्या पद्धतीने बांधली होती. ही जागा लढलो असतो, तर सर्वाधिक जास्त मतांनी ही जागा निवडून आली असती. पण श्रेष्ठी जो निर्णय घेतात, तो योग्य असतो. महाविकास आघाडीचा उमेदवार असो किंवा अन्य कुणीही, जे पक्षश्रेष्ठी सांगतील, त्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे गंगाधर नाकाडे यांनी सांगितले.

राज्यात पाच ठिकाणी, कोकण, औरंगाबाद, नागपूर येथे शिक्षक आणि नाशिक, अमरावती येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत. यांपैकी नाशिक पदवीधर आणि नागपूर शिक्षक हे दोनच मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिले आहे. नाशिक सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे आणि शिवसेनेचा पाठिंबा लाभलेल्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्याने, तर नागपूर गंगाधर नाकाडे यांची माघार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सतीश इटकेलवार हे नॉट रिचेबल असल्यामुळे. आता नागपुरात रिंगणात २२ उमेदवार असणार आहेत.

नागपूर शिक्षक मतदार संघात आज पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये नीलकंठ उईके, अतुल रुईकर, मुकेश पुडके, मृत्युंजय सिंग आणि गंगाधर नाकाडे यांचा समावेश आहे. एकूण २७ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. पैकी पाच उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे २२ उमेदवार या निवडणुकीत नशीब अजमावणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT