Shiva Rajyabhishek Year Ceremony News : आमचं, तुमचं सर्वांचं सौभाग्य आहे, की जाणता राजा शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीत आपण जन्म घेतला. राज्याभिषेकाचे ३५० वर्ष पूर्ण झाले. शिवाजी महाराजांना सम्राट व्हायचं नव्हतं आणि राजाही व्हायचं नव्हतं. पण रयतेचं राज्य यावं, हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं, यासाठीच त्यांचे सर्व प्रयत्न होते, असे राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
यासंदर्भात मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. काझी आलमगीर समजणाऱ्या क्रूर आणि स्वतःला सम्राट समजणाऱ्यांवर मात करता यावी, यासाठी मॉ जिजाऊंनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाचा आग्रह केला. महाराजांनी १६७४ साली ६ जून रोजी राज्याभिषेक केला. तो अभूतपूर्व सोहळा ४० दिवस चालला. राज्याभिषेकाच्या अगोदर प्रतापगडावर मॉ भवानीचं दर्शन घेऊन भवानीचा आशीर्वाद घेतला आणि छत्र अर्पण केलं. या काळात आम्हीही महाराष्ट्र सरकारच्यावतीने प्रतापगडावर छत्र अर्पण केलं आहे, असेही मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
रायगडावर उद्या २ जूनला म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षानिमित्त सोहळ्याचे आयोजन राज्य सरकार आणि शिवभक्तांनी एकत्र येऊन केलं आहे. रायगडाच्या त्या पवित्र वातावरणात तमाम शिवभक्त उद्या हा भव्यदिव्य सोहळा साजरा करणार आहेत. राज्य सरकारने त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत संपूर्ण हिदुस्थानचे स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा गेल्या २८ वर्षांपासून आम्ही मावळे रायगडावर साजरा करतो. यावर्षीही उद्या २ जूनला आम्ही तो साजरा करतो आहे. यावेळी राज्य सरकारने या सोहळ्यासाठी आम्हाला सर्वतोपरी मदत केली आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार शिवराज्यभिषेक समितीला मजबूत पाठिंबा दिला आहे, असे दुर्गराज रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार म्हणाले.
३५० वर्षांनंतर आणि महाराष्ट्र (Maharashtra) सरकारच्या इतिहासात महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक सोहळा इतक्या भव्य प्रमाणात आयोजित करण्यासाठी जर कुणी मदत केली असेल, तर ते शिंदे-फडणवीसांचे सरकार आहे. मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आम्हाला पाठिंबा देऊन राज्याची मान उंचावली आहे. आज महाराजांचे मावळे म्हणून आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे, असेही पवार यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.