MLA Ravi Rana News sarkarnama
विदर्भ

अमरावतीत आमदार रवी राणांसह 11 जणांवर गुन्हा ; आज काम बंद आंदोलन

पाच जणांना राजापेठ पोलिसांनी अटक केली. हे पाच ही जण युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते आहे.

सरकारनामा ब्युरो

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अमरावतीमध्ये वाद पुन्हा पेटला आहे. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रवी राणा यांनी काही दिवसापूर्वी महापालिकेत केली होती, पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (Praveen Ashtikar) यांच्या अगांवर शाई फेकण्याचा प्रकार बुधवारी घडला. काल झालेल्या शाईफेकीच्या विरोधात आज (गुरुवारी) अग्निशमन दल वगळता सर्व कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. शाईफेक प्रकरणात आमदार रवी राणांवर (Ravi Rana)गु्हा दाखल करण्यात आला आहे. रवी राणा आणि अन्य 11 आरोपींवर कलम 307 नुसार हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

''ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजकारण केलं. महापालिका, पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन त्या ठिकाणी पुतळा बसवू दिला नाही. प्रशासनावरही दबाव आणला असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,'' असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना रवी राणा म्हणाले.

आष्टीकर यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर हत्येचा प्रयत्न करणारी कलम 307 चा गुन्हा रात्री पावणेअकरा वाजता दाखल करण्यात आला. याप्रकरणी एकूण सात जणांवर विविध कलम लावून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पाच जणांना राजापेठ पोलिसांनी अटक केली. हे पाच ही जण युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते आहे.

मनपा आयुक्त आष्टीकर हे बुधवारी दुपारी त्यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचारी आणि मनपा अधिकारीसह उड्डाणपुलाखाली दाखल झाले. त्यावेळी दोन महिला आणि काही शिवप्रेमी दाखल होऊन काहीच वेळात आष्टीकर यांना पकडून त्यांच्या अंगावर काळी शाई फेकली. या झटापटीतून आष्टीकर यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा त्यांचा पाठलाग करून त्यांची कॉलर पकडून दोन महिलांनी शाई फेकून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या, त्यानंतर त्यांनी त्याठिकाणाहून पळ काढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT