Eknath Shinde and Shrikant Shinde Sarkarnama
विदर्भ

Shivsena Eknath Shinde : शिंदे गट चंद्रपुरात वाढवतोय ताकद, गळाला लावला काँग्रेसचा ‘हा’ युवा नेता !

Chandrapur : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा, महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

संदीप रायपूरे

Shivsena Eknath Shinde : चंद्रपुरातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे युवा नेते विनोद बुटले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांना आता शिवसेनेच्या शिंदे गटाने गळाला लावले आहे. बुटले यांना पक्षाने युवासेना प्रमुख पद दिलं आहे. शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नुकताच त्यांचा पक्षप्रवेश करत त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.

येणारा काळ हा निवडणुकांचा काळ असणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा, महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी विविध पक्षांनी आत्तापासून तयारी सुरू केली आहे. नेत्यांनी आपल्या कामांना वेग दिला आहे. भूमिपूजन, कार्यकर्ता मेळावे, स्त्री शक्ती सन्मान असे विविध उपक्रम राबवीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपचे वर्चस्व आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचीही ताकद बऱ्यापैकी आहे. वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जिल्हाभर आहेत. पण शिवसेना एकनाथ शिंदे गटाची जिल्ह्यात फारशी ताकद नाही. सत्ता असल्याने व एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने काही कार्यकर्ते त्यांच्या पक्षाशी जुळले आहेत. आता शिंदे गटाने जिल्ह्यात आपली ताकद वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे.

नितीन बुटले हे गेल्या वीस वर्षांपासून काँग्रेसमध्ये आहेत. वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बालेकिल्ल्यातील बल्लारपूर विधानसभेत त्यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले आहे. बल्लारपूर तालुका ग्रामीण विभागाचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. भाजपचे प्राबल्य असलेल्या कोठारीत विनोद बुटले यांच्याच नेतृत्वात बहुमताने काँग्रेसची सत्ता आली. या वेळी बुटले यांच्या आई गोपिका बुटले यांना सरपंच होण्याचा मान मिळाला होता.

विनोद बुटले यांनी तत्कालीन खासदार नरेश पुगलिया यांच्यापासून तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पक्षासाठी काम केलेले आहे, पण गेल्या काही दिवसांपासून ते पक्षीय धोरणावर नाराज होते. पक्षातील स्थानिक नेत्यांच्या कुरघोडीमुळे त्रस्त होऊन त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटात त्यांनी प्रवेश घेतला. या वेळी डॉ. श्रीकांत शिंदे, किरण पांडव, शुभम नवले, हर्षद शिंदे, प्रतिमा ठाकूर, नितीन मत्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत बुटले यांना चंद्रपूर जिल्हा युवासेना प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याकडे चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT