Agitation against Sanjay Raut Sarkarnama
विदर्भ

Shivsena : खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारले, अन् पोलिसात तक्रारही केली !

सरकारनामा ब्यूरो

Akola District Shivsena News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर खोटे व तथ्यहीन आरोप करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठी अकोला जिल्हा शिवसेनेच्यावतीने आज सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली.

सिव्हिल लाइन्स चौकात खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनसुद्धा करण्यात आले. अकोला जिल्हा शिवसेनेच्यावतीने (शिंदे गट) करण्यात आलेल्या या आंदोलनात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करून कारवाई करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. आक्रमक शिवसैनिकांनी यावेळी खासदार संजय राऊत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी राजा ठाकूर या गुंडाला मला मारण्याची सुपारी दिली आहे. असा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर गृह विभागाने या प्रकरणाची चौकशीही सुरू केली. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते आक्रमक झाले आणि आज सिव्हिल लाइन्स चौकात एकत्र येत आंदोलन केले.

आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आश्विन नवले, महानगर प्रमुख योगेश अग्रवाल, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मानकर, निखिल ठाकूर, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, महेश मोरे पाटील, तालुकाप्रमुख प्रकाश पाटील गीते, दीपक दांदळे, प्रवीण वैष्णव, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख राज यादव, शुभम साहू, सौरभ नागोसे, ललित वानखडे, हिरामण कुंबरे, उपशहर प्रमुख गणेश गोगे, बजरंग अग्रवाल, सचिन पाचपोर, निखिल बोरीकर, प्रफुल तायडे, जय गेडाम, पवन गेडाम, शशांक ठाकूर, नागेश इंगोले, गोपाल गीते, स्वप्निल अंधारे, रामलाल साहू, प्रशांत शेलूरकर, संतोष पांडे, किशोर घाडगे, संदीप मस्तुद, गोपाल सरोदे, संतोष गिरे, वैद्यकीय आघाडी प्रमुख राजू भोरस आकाश जाधव आदींनी सहभाग घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT