Sanjay Rathod | Devendra Fadnavis | Supriya Sule Sarkarnama
विदर्भ

राठोडांना क्लिनचीट : आता खोटे आरोप केल्याचे मान्य करुन फडणवीसांनी हात जोडून माफी मागावी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यभर गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले माजी वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलिसांकडून क्लिनचीट मिळाली असल्याचे घोषित केले. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. यामुळे आता राठोड यांचे राज्य मंत्रिमंडळात पुनरागमन निश्चित मानले जात आहे.

दरम्यान राठोड यांना मिळालेल्या क्लिनचीटवरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. राठोडांवर आपण खोटे आरोप केले हे आता फडणवीस यांनी मान्य करुन टिव्हीवरुन जाहिररित्या हात जोडून त्यांची माफी मागावी, आणि पूजा चव्हाणच्या घरी जावून या प्रकरणाचा तपास आम्ही करु तिला न्याय देवू असे सांगण्याचे आव्हानही सुळे यांनी दिले. आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मेरगळवाडी गावातील एका कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आज यांना मुख्यमंत्र्यांनी क्लिनचीट दिल्याची बातमी वाचली. पण ज्यावेळी पूजा चव्हाणची आत्महत्या झाली तेव्हा भाजप विरोधी पक्षात होता आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते. तेव्हा त्यांनीच राठोड यांच्यावर आरोप करुन थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. आज राठोड यांना क्लिनचीट मिळाली आहे. याचा अर्थ भाजपने त्यावेळी राठोड यांच्यावर खोटे आरोप केले होते, हे फडणवीस यांनी मान्य करावे, असे आव्हान सुळे यांनी दिले.

तसेच खासदार सुळे यांनी तीन पर्याय देत आता देवेंद्र फडणवीस यांनी टिव्हीवर येवून खोटे आरोप केल्याचे मान्य करावे आणि राठोड यांची जाहीर माफी मागावी. सोबतच संजय राठोड यांनी हे कृत्य केले नसेल तर पूजा चव्हाणच्या घरी जावून या प्रकरणाचा तपास आम्ही करु तिला न्याय देवू असे तिच्या कुटूंबियांना आश्वासन द्यावे. अन्यथा आम्ही असं समजू की भाजपचे सरकार आल्यानंतर क्लिनचीट मिळते, आणि याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आवाज उठवले, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT