Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Shivsena News: शिवगर्जनेत उपराजधानीकडे ठाकरेंचे दुर्लक्ष, पण ‘शिवधनुष्य’ साठी शिंदे येणार !

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News: शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने राज्यात शिवगर्जना यात्रा सुरू केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे गटाने शिवधनुष्य यात्रेचे नियोजन केले आहे.

शिवसेनेच्या शिवगर्जना यात्रेदरम्यान ठाकरे गटाने उपराजधानी नागपूरकडे दुर्लक्ष केले. पण शिंदे सेनेच्यावतीने काढण्यात येणाऱ्या शिवधनुष्य यात्रेसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नागपूरला बोलवण्यात येणार आहे. रामटेकच्या गडमंदिरावर त्यांचा कार्यक्रम घेण्याचे नियोजन सध्या केले जात आहे.(Eknath Shinde will come to Nagpur at Gadmandir Ramtek)

शिवसेना पक्ष (Shivsena) आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे (Eknath Shide) गटाला बहाल केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावतीने राज्यभर शिवगर्जना यात्रा काढल्या जात आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये माजी केंद्रीयमंत्री अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत शिवर्गजना यात्रेचे कार्यक्रम पार पडले आहे. नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यात अद्याप एकही कार्यक्रम त्यांचा झालेला नाही.

शिंदे सेनेच्यावतीने अलीकडेच शिवधनुष्य यात्रेची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दरम्यान संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदरासंघाचे संपर्क प्रमुख म्हणून खासदार कृपाल तुमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा किमान एक तरी कार्यक्रम घेण्याचे त्यांनी ठरविले आहे. रामटेकचा कार्यक्रम गडमंदिरावर घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

रामटेकमधून कृपाल तुमाने दोन वेळा निवडून आले आहेत. ते आता शिंदे सेनेत सहभागी झाले आहेत. हा मतदारसंघ राखण्यासाठी तुमाने यांना महाविकास आघाडीतील तीन पक्षांचा सामना करावा लागणार आहे. त्याकरिता शिवधनुष्य यात्रेच्या माध्यमातून मशागत केली जात आहे. रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल हेसुद्धा शिंदे सेनेत सहभागी झाले असल्याने आज घडीला रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडे एकही आमदार शिल्लक नाही.

शिवधनुष्य यात्रे सोबतच गाव तिथे शाखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वात यात्रा आणि शाखा उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. शिंदे सेनेला शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले. यास ठाकरे सेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने सध्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला.

केव्हाही काही होऊ शकते, या भीतीमुळे उद्धव ठाकरे यांच्यावतीने शिवगर्जना यात्रा सुरू करण्यात आली. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात शिवगर्जना यात्रेला सुरुवात झाली. त्यामुळे शिंदे सेनेनेसुद्धा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. शिवधनुष्य यात्रा आणि गाव तिथे शाखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा आढावा आज खासदार कृपाल तुमाने यांनी रविभवन येथे बैठकीत घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT