MLA Shweta Mahale
MLA Shweta Mahale 
विदर्भ

आवाज बंद....; श्वेता महालेंनी कृषी अधिकाऱ्यांना अक्षरश: झापलं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अधिकाऱ्यांना अनेकदा नेतेमंडळींच बोलणं खाव लागतंं, अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. काही नेते तर अनेकदा अधिकाऱ्यांना नाही तर वेळ पडल्यास आपल्या कार्यकर्त्यांनाही फैलावर घेतात. मात्र यावेळी थोडा वेगळाच प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार श्वेता महालेंच्या (Shweta Mahale) एका व्हिडिओची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

शुक्रवारी (१७ जून) बुलडाण्यात आमदार श्वेता महाले यांनी कृषी अधिकाऱ्यांची (Agriculture Office) एक बैठक बोलवली होती. या बैठकीत काही मुद्द्यांवर आक्षेप घेत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आवाज बंद.. इतके दिवस झोपा काढत होतात का ?, मी बोलते ना, तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोलले का ?, म्हणत श्वेता महालेंनी भर बैठकीत कृषी अधिकाऱ्यांना खडसावले. या प्रकारामुळे त्यामुळे काही काळ सभागृहात शांतता पसरली होती.

त्याचं काय झालं, कृषी केंद्र चालकांकडून बुलडाणा जिल्ह्यात खतांचे लिंकिंग होत आहे. त्यामुळे शेतकरी ऐन पेरणीच्या दिवसात अडचणीत आल्याची माहिती आमदार श्वेता महाले यांना मिळाली. त्यावर चिखली मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी, कृषी कंपन्या चे प्रतिनिधींची एक बैठक बोलवली. या बैठकीत आमदार महालेंनी खतांची लिंकिंग न करण्याच्या सूचना केल्या. पण तरीही लिंकिंग होत असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सुद्धा कृषी विभागाकडे केली.

पण त्याच वेळी भर बैठक सुरू असताना आमदार महाले यांनी भर बैठकीत जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी अनिसा महाबळे याना चांगलेच झापले. आमदार महाले ह्या कृषी अधिकाऱ्यांना दुकानदार कसे लिंकिंग करतात याचे काही पुरावा दाखवत होत्या, पण त्याच वेळी कृषी अधिकारी अनीसा महाबळे मधेच बोलायला लागल्या. त्यावर चिडलेल्या श्वेता महाले यांनी थेट, आवाज बंद..इतके दिवस झोपा काढत होतात का?, असे म्हणत त्यांना चांगलेच झापले. त्याच वेळी तिथे उपस्थित कृषी अधिकाऱ्यांनाही शांत केले. श्वेता महाले चिडल्यामुळे संपूर्ण सभागृहात काही वेळ शांतता पसरली. पण आमदार महालेंनी भर सभागृहात अधिकाऱ्यांना झापल्याने इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्गात मात्र नाराजी पसरली एव्हढे निश्चित ..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT