anil bonde manoj jarange patil shyam manav.jpg sarkarnama
विदर्भ

Anil Bonde : "श्याम मानव अन् जरांगे-पाटलांच्या रूपानं फडणवीसांच्या अंगावर कुत्रे सोडलेत", भाजप खासदार अनिल बोडेंचं विधान

Anil Bonde On Devendra Fadnavis : "मराठ्यांना आरक्षण देताना देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला नाही," असं अनिल बोंडेंनी म्हटलं.

Akshay Sabale

भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय समन्वयक श्याम मानव आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे.

श्याम मानव आणि जरांगे-पाटील यांच्या रूपाने देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावर कुत्रे सोडले आहेत, असं खासदार बोंडे ( Anil Bonde ) यांनी म्हटलं आहे. खासदार बोंडे यांच्या वक्तव्यानंतर नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ते यवतमाळमध्ये भाजपच्या अधिवेशनात बोलत होते.

अनिल बोंडे म्हणाले, "खोटे नॅरेटिव्ह आपल्याला खोडणं आवश्यक आहे. गैरसमज पसरवणारा पसरवणारच आहे. फेक नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह करून रडत बसण्यात अर्थ नाही. त्यांना खोटे बोलण्याची सवय आहे. ते खोटे बोलणारच आहेत. आता ते एकटे खोटे बोलणार नाहीत. त्यांनी आता अंगावर कुत्रे सोडले आहेत. एक श्याम मानवच्या रूपात सोडला की देवेंद्र फडणवीसांवर ( Devendra Fadnavis ) वाईट-वाईट बोल. एक मनोज जरांगे सारखा सोडला आहे."

"मनोज जरांगे ( Manoj Jarange ) मराठा आरक्षण, मराठा आरक्षण करतो. आत्तापर्यंत मराठा मुख्यमंत्री किती होते? यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. पण, ज्यांच्या सांगण्यावरून तू बोलतोय, ते शरद पवारसाहेब सुद्धा मुख्यमंत्री होते. तेव्हा शालिनीताई पाटील मराठा आरक्षण मागत होत्या. तेव्हा काय झालं?" असा सवाल अनिल बोडेंनी उपस्थित केला आहे.

"नरेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांचे वडील आण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी गोळी घालून घेतली. मराठा मुख्यमंत्री असताना त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यावं वाटलं नाही. 2014 ते 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिलं. मराठ्यांना आरक्षण देताना देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला नाही," असं अनिल बोडेंनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT