Navneet Rana|
Navneet Rana| Sarkarnama
विदर्भ

तर.. Navneet Rana यांची खासदारकी रद्द होणार?

सरकारनामा ब्युरो

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. बनावट जात प्रमाणपत्राप्रकरणी शिवडी कोर्टात यावर सुनावणी सुरू होती. या सुनावणीत शिवडी न्यायालयाने बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. यासोबतच मुंलूंड पोलिसांनाही कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्यावर काय कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बनावट जात प्रमाणपत्रा प्रकरणी नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या महिन्यांभरापासून यावर सुनावणी सुरू होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शिवडी न्यायालयाने नवनीत राणांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. राणा यांच्यावर कारवाई होणार का? अशी चर्चा रंगली आहे.

शिवडी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर खासदार राणांनी बनावट जात प्रमाणपत्राप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मात्र सत्र न्यायालयानेही कारवाईला स्थगिती दिलेली नाही. शिवडी न्यायालयाने पोलिसांना अजामीनपात्र वॉरंट काढत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.सात नोव्हेंबर २०२२ रोजी याप्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे त्यामुळे आता पोलिस काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मागच्या वर्षी जून महिन्यात उच्च न्यायालयाने नवनीत राणांचे जातप्रमाणपत्र बनावट असल्याचे सांगत त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केलं. त्याचवेळी न्यायालयाने नवनीत राणांना दोन लाखांचा दंडही सुनावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राणांची खासदारकीही धोक्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. पण जून 2021मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT