Gadchiroli Shivsena Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli Politics : ...म्हणून शिवसेनेनं अहेरी - चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गच रोखला ; दोन तास वाहतूक ठप्प

Shivsena Protest News : सूरजागड ते बल्लारपूर या मार्गावरून दरदोज प्रकल्पाची हजारो वाहन धावतात...

संदीप रायपुरे - Sarkarnama

Gadchiroli Politics : सूरजागड लोहप्रकल्प नागरिकांच्या जिवावर उठला आहे. प्रकल्पाची हजारो वाहने सुरजागड ते बल्लारपूर मार्गावरून जातात. या वाहनांनी अनेकांचे जीव घेतले आहेत. अनेकांना तर कायमचे अपंगत्व आले. एकीकडे सुरजागड, कोनसरी प्रकल्पाने रोजगार मिळेल ही चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील बेरोजगारांची अपेक्षा फोल ठरली.

कंपनीने बऱ्याच ठिकाणी सुरक्षारक्षक नेमले नाहीत. या मुद्द्याला घेत शिवसेना प्रचंड आक्रमक झाली. बुधवारी अहेरी - चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावरील नवेगाव टोलनाक्याजवळ रास्ता रोखून बुधवारी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे जवळपास दोन तास वाहतूक ठप्प होती.

गडचिरोली जिल्ह्यात सूरजागड व कोनसरी प्रकल्प हे दोन मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पाने गडचिरोली जिल्ह्यातील अनेकांना रोजगाराची संधी मिळाली. सूरजागड ते बल्लारपूर या मार्गावरून दरदोज प्रकल्पाची हजारो वाहन धावतात. या वाहनांनी आतापर्यत अपघाताने अनेकांचे जीव घेतले आहेत. तर काहींना कायमचे अपंगत्व आले. (Latest Marathi News)

सूरजागड कंपनीच्या मोठया प्रमाणात होत असलेल्या वाहतूकीने नागरिकांच्या जिवाचा प्रश्न निर्माण झाला. यामुळे गोंडपिपरी तालुक्यातील सामाजिक कार्येकर्ते,राजकीय पक्ष व व्यापाऱ्यांनी हा प्रश्न उचलून धरला. वारंवार होत असलेल्या मागणीनंतर सूरजागड कंपनीने वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली.(Vidarbha Politics)

गोंडपिपरी तालुक्यात वाहतूकीचे नियंत्रण ठेवण्यासाठी गडचिरोली जिल्हयातील काही तरूणांना कामावर लावण्यात आले. सध्या कार्यरत असलेल्यापैकी अनेक सुरक्षारक्षक हे बाहेरचे आहेत. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार हिरावला जात असल्याचा आरोप गोंडपिपरी तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.आक्सापूर,करंजी,धानापूर,जोगापूर गावात मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंसरी व सुरजागड येथून लोहखनिज घेऊन जाणार्या हायवा पार्किंग केल्या असतात. (Shivsena)

त्यामुळे अपघातात वाढ झाल्याने या परिसरातील मुख्य मार्गावर सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी शिवसेनेने राष्ट्रीय महामार्गवर नवेगाव वाघाडे टोल नाक्यावर तालुकाप्रमुख सूरज माडुरवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन करत दोन तास वाहतूक अडवून धरली होती.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,उपनगराध्यक्ष सारिका मडावी,नगरसेवक यादव बांबोडे,नगरसेवक आशिष कावटवार,नगरसेवक बालाजी मेश्राम,शहरप्रमुख विवेक राणा,युवासेना तालुकाप्रमुख तुकाराम सातपुते,शहर उपप्रमुख रियाज कुरेशी,अशपाक कुरेशी,काशिनाथ पोटे,महेश श्रीगिरिवार,सुरज गोरंटवार,गौरव घुबडे,दर्शन वासेकर,गोकुल सोनटक्के,स्वप्नील नागपुरे, गोंडपिपरीसह अनेक गावातील नागरिकांची शेकडोंच्या संखेने उपस्थिती होती.

आंदोलनादरम्यान रुग्णवाहिका आली असता त्यांना आंदोलनकर्त्यांनी मार्ग काढून देत सामाजिक भान ठेवले. त्याबद्दल कौतुक होत आहे. यावेळी ठाणेदार जीवन राजगुरू,तहसीलदार कदम व कंपनीच्या अधिकाऱ्यांना तालुकाप्रमुख सुरज माडुरवारांच्या नेतृत्वात निवेदन देऊन ७ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT