Dr. Ashish Deshmukh and MP. Dr. Shashi Tharur. Sarkarnama
विदर्भ

Ashish Deshmukh : सोनियांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकला होता, आता तुम्हीही ऐका !

डॉ. देशमुख (Dr. Ashish Deshmukh) यांनी थरूर यांच्या प्रचाराचा नारळ विदर्भात फोडला होता, हे विशेष.

Atul Mehere

नागपूर : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येते आहे आणि कॉंग्रेसचे विदर्भवादी नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख खासदार डॉ. शशी थरूर यांच्या प्रचारार्थ जोरात भिडले आहेत. थरूर यांच्या विजयासाठी त्यांनी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिले आहे.

सोनिया गांधींनी (Soniya Gandhi) २००४ मध्ये म्हटले होते की, आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मी पंतप्रधान (Prime Minister) पदाचा त्याग करत आहे. त्याचप्रमाणे कॉंग्रेस (Congess) कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आज आपल्या अंतरात्म्याला विचारायचे हवे की, कोणता उमेदवार योग्य आहे आणि अंतरात्म्याचा आवाज ऐकून निर्णय घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. डॉ. देशमुख (Dr. Ashish Deshmukh) यांनी थरूर यांच्या प्रचाराचा नारळ विदर्भात फोडला होता, हे विशेष.

डॉ. देशमुख पत्रात म्हणतात, ‘प्रिय काँग्रेसजन हो, सस्नेह नमस्कार. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडण्यात यावा, यासाठी श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी सहमती दर्शविली. गांधी कुटुंब या पारदर्शी निवडणुकीपासून अलिप्त राहणार असून तब्बल २४ वर्षांनी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. पक्षात विकेंद्रीकरणासाठी हे महत्वाचे पाऊल असून कॉंग्रेसचे भविष्य उज्ज्वल आहे. राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि ‘जी-२३’ गटाचे खासदार डॉ. शशी थरूर यांच्यात सरळ लढत होणार आहे.

थरूर उच्चशिक्षित व अभ्यासू खासदार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे काम आहे. ३० सप्टेंबरला नवी दिल्ली येथे डॉ. शशी थरूर यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन भरले, त्यांच्या समर्थनार्थ त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. १२ राज्यांतील कॉंग्रेस समर्थकांनी त्यांना खुले समर्थन दिले आहे. विदर्भातून त्यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा व्हावा म्हणून मी त्यांचा २ दिवसांचा दौरा आखला. १ ऑक्टोबरला नागपूर येथील दीक्षाभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करून व बाबासाहेबांवर लिहिलेले पुस्तक समर्पित करून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. २ ऑक्टोबर, गांधी जयंतीला सेवाग्राम येथील गांधी आश्रम तसेच इंदिराजींचे मार्गदर्शक विनोबा भावे यांच्या पवनार येथील पावन स्मृतीस अभिवादन करून त्यांनी नागपूर येथे कॉंग्रेसचे विविध पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

येत्या १७ ऑक्टोबरला त्यांचा कॉंग्रेस अध्यक्षपदाचा विजय निश्चित व्हावा, अशी आम्हां सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. डॉ. शशी थरूर यांचे पक्षातील सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. पक्षाला नवी दिशा दाखविण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यानिमित्याने, पक्षाला नव्या ताकदीने पुढे नेऊन देशात कॉंग्रेसला सत्तेत आणण्याची जबाबदारी ते समर्थपणे सांभाळू शकतील, असा विश्वास आहे. खूप वर्षे झालीत, कॉंग्रेस पक्ष एकाच ठिकाणी थांबला असल्याचे दिसते. या पॉजला (pause) फास्ट फॉरवर्ड करण्यासाठी, कॉंग्रेस पक्षाला प्रशासकीय अडचणींतून बाहेर काढण्यासाठी आणि कॉंग्रेसमध्ये गुणात्मक परिवर्तनासाठी डॉ. शशी थरूर हवे आहेत. फक्त पक्षासाठीच नव्हे तर सामान्य कार्यकर्त्यांसाठीसुद्धा डॉ. शशी थरूर हवे आहेत.

इंदिराजींनी व्हीव्ही गिरी व नीलम संजीव रेड्डी यांच्या निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसजनांना आवाहन केले होते की, आपण सद्सदविवेकबुद्धीला जागृत करून गुप्त मतदान करावे. सोनियाजींनी सुद्धा २००४ मध्ये म्हटले होते की, आपल्या अंतरात्म्याला विचारून पंतप्रधान पदाचा त्याग करत आहे. त्याचप्रमाणे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आपल्या अंतरात्म्याला विचारायचे हवे की, कोणता उमेदवार चांगला आहे; शशी थरुर हेच उत्तर असेल. कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या करिअरसाठी- उज्ज्वल भविष्यासाठी डॉ. शशी थरूर यांची गरज आहे. मी स्वत: व कार्यकर्ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत जाऊन मतदारांना भेटणार आहे आणि सर्वांनी डॉ. शशी थरूर यांना मते देऊन विजयी करावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. आपण सर्व कॉंग्रेसचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते यांना मी नम्र आवाहन करीत आहे की, कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी डॉ. शशी थरूर यांना पाठिंबा द्यावा आणि ते जिंकून येतील यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून कॉंग्रेसचे व कार्यकर्त्यांचे भविष्य उज्ज्वल करता येईल.’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT