Rahul Gandhi, Sonia Gandhi, Priyanka Gandhi. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Congress Maharally : सोनिया, प्रियंकांचा दौरा रद्द, राहुल गांधी मात्र...

Hai Taiyaar Hum : सभेच्या अनेक तासांपूर्वीच दिघोरीतील मैदान झाले हाऊसफूल्ल

प्रसन्न जकाते

Bharat Jodo Ground : लोकसभा निवडणुकीपूर्वी उपराजधानी नागपूर येथे होत असलेल्या महारॅलीतून काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनी गुरुवारी (ता. 28) प्रचाराचा शंखनाद फुंकला जाणार आहे. यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचा दौरा निश्चित होता. मात्र गुरुवारी सकाळी घडलेल्या घडामोडीनंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या दौऱ्यात बदल झाला.

महारॅलीच्या तयारीसाठी काँग्रेसमधील अखिल भारतीय स्तरावरील नेत्यांनी हिवाळी अधिवेशन सुरू असताना बैठक घेतली. त्यावेळी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपैकी केवळ मल्लीकार्जुन खरगे, राहुल गांधी येतील असे सांगितले जात होते. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी हे देखील महारॅलीला येणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. त्यामुळे काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला.

देशभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळपासूनच दिघोरी परिसरातील महारॅलीच्या ‘भारत जोडो मैदान’ येथे दाखल झालेत. तोपर्यंत केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांचा अधिकृत दौरा काँग्रेसकडून जाहीर करण्यात आला होता. अन्य नेत्यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता होती. त्यानंतर दुपारच्या सुमारास सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांचा दौरा रद्द झाल्याचे स्थानिक नेत्यांन स्पष्ट केले. राहुल गांधीही येणार की नाही, याबाबत ठामपणे कोणाहीजवळ माहिती नव्हती.

सोनिया गांधी, प्रियंका येणार नसल्याने आणि राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चिता असल्याने नेमके काय होणार, अशी चर्चा ‘भारत जोडो मैदान’ येथे सुरू झाली होती. परंतु काही वेळातच राहुल गांधी येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे चेहरे पुन्हा फुलले. दुपारी पावणे दोनच्या सुमारास राहुल गांधी यांचे नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्याची घोषणाही सभास्थळी करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसच्या या महारॅलीसाठी तीन व्यासपीठांची उभारणी करण्यात आली होती. 220 मान्यवरांच्या बैठक व्यवस्थेसह एकूण 620 मान्यवर व्यासपीठावर बसू शकतील, अशी ही त्रिस्तरीय बैठक व्यवस्था प्रत्येक व्यासपीठावर होती. काँग्रेसच्या अखिल भारतीय पातळीवरील नेत्यांसह काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही महारॅलीत सहभागी होणार असल्याने कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता. नागपूर पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या. सुरक्षेच्या कारणावरून गुप्तचर विभागाचे अधिकारीही सभास्थळी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला होता.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT