Nagpur Municipal Corporation Sarkarnama
विदर्भ

NMC : ‘हॅलो’ नव्हे ‘वंदे मातरम’ने करा सुरूवात; अतिरिक्त आयुक्त राम जोशींचे आवाहन...

नागपूर (Nagpur) महानगरपालिकेत ‘हॅलो’ नव्हे ‘वंदे मातरम’ने संवादाची सुरुवात करावी, यासाठी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी परिपत्रक काढले आहे.

Atul Mehere

नागपूर : राज्याचे वनमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सांस्कृतिक विभागासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे, दूरध्वनी, भ्रमणध्वनी किंवा प्रत्यक्ष संवाद साधताना, संवादाची सुरूवात हॅलो ने नव्हे तर वंदे मातरम् ने करावी. शासनाने तसे आदेश पारित केले आणि त्यांच्या या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नागपूर (Nagpur) महानगरपालिकेत ‘हॅलो’ नव्हे ‘वंदे मातरम’ने संवादाची सुरुवात करावी, यासाठी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी परिपत्रक काढले आहे.

महापालिकेत (Municipal Corporation) नागरिकांनी फोन केला तर कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांकडून ‘हॅलो’ असे ऐकायला येते. परंतु आता कर्मचारी, अधिकाऱ्यांपुढे ‘हॅलो’ नव्हे तर ‘वंदे मातरम्’ने संवाद सुरू करण्याची सवय लावून घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी परिपत्रक काढून नागरिकांसोबतच नव्हे तर एकमेकांशी फोनवरून संवाद साधतानाही ‘वंदे मातरम्’ने सुरुवात करण्याच्या सूचना केल्या आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या मुख्यालयात तसेच सर्व झोन कार्यालयात दूरध्वनीवरील संवादाची सुरूवात 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्'' या अभिवादनाने केली जाईल. शासकीय कार्यालयातील दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागतांशी किंवा सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संभाषण करताना 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम'ने सुरुवात करावी, अशा सूचना राज्य शासनाच्या आहेत. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी नागपूर महानगरपालिकेतील सर्व विभागप्रमुख, दहाही झोनचे साहाय्यक आयुक्त आणि कर्मचाऱ्यांना काही सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत.

महानगरपालिकेअंतर्गत सर्व कार्यालयांत दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागतांशी किंवा सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संभाषण करताना हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम’ या अभिवादनाने सुरुवात करण्यात यावी, असे परिपत्रक काढण्यात आले. वैयक्तिक भ्रमणध्वनीवर संवाद साधतानाही 'वंदे मातरम' असे अभिवादन करण्यास सर्व संबंधितांना प्रोत्साहित करावे. कार्यालयात, संस्थेमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनाही सार्वजनिक जीवनात ‘वंदे मातरम’ने अभिवादन करण्याबाबत जाणीव जागृत करावी.

विविध विविध बैठकांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करताना ‘वंदे मातरम’ या शब्दांनी करावी. यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. याशिवाय 'वंदे मातरम' अभिवादनाचा अधिकाधिक वापर करून अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT