Kirit Somaiya criticise Uddhav Thackeray, Kirit Somaiya News, Political News Marathi
Kirit Somaiya criticise Uddhav Thackeray, Kirit Somaiya News, Political News Marathi sarkarnama
विदर्भ

सोमय्यांची बेताल वक्तव्ये थांबवा; अन्यथा सत्तेला लाथ मारु : शिंदे गटाचा भाजपला इशारा

Umesh Bambare-Patil

बुलढाणा : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे संतप्त झाले आहेत. आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज सोमय्यांनी करून घेऊ नये. यापुढे त्यांनी बेताल वक्तव्ये थांबवावीत. अन्यथा, आम्हाला सत्तेची पर्वा नाही, सत्तेला लाथ मारु असा इशारा आमदार गायकवाड यांनी दिला आहे.

काल किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. माफिया मुख्यमंत्र्यांना हटविल्याबद्दल आभार अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली होती. यावर बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यामुळे भाजपा व शिंदे गटातही मतभेद आता चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र आहे.

आमदार गायकवाड म्हणाले, किरीट सोमय्यांनी असं काही समजू नये, की आता शिवसेना संपली. ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजपा-शिवसेना युती म्हणून काम करतोय. आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे व उद्धव साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समझ किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये. यापुढे त्यांनी असे बेताल वक्तव्ये करू नयेत. अन्यथा, आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशाराच संजय गायकवाड यांनी दिला आहे.

टोल नाक्यावर पंढरपूर जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवू नये. अन्यथा, कारवाई करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. पंढरपूर जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तरीही टोल नाक्यावर वसूली केली जात असल्याचे अनेक फोन मला आले. त्यामुळे मी टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांना आवाहन करतो की, वारकऱ्यांना त्रास न होता त्यांची वाहने जाऊ द्यावे. अन्यथा, कारवाई करण्याचा इशारा आमदार गायकवाड यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT