Sudhakar Adbale and Nago Ganar Sarkarnama
विदर्भ

MVA News: सुधाकर अडबाले विजयाच्या उंबरठ्यावर, भाजपसाठी धोक्याची घंटा?

Graduate Constituency Election Result: आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार २८ हजार मतांची मोजणी झालेली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Constituency Election Result: गेल्या वर्षी झालेल्या नागपूर (Nagpur) पदवीधर निवडणुकीप्रमाणे यावेळी नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे (Election) निकाल धक्कादायक लागतात की काय, असे चित्र सध्यातरी तयार झाले आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जात आहे.

आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार २८ हजार मतांची मोजणी झालेली आहे. त्यांपैकी सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) यांना १४ हजार मते मिळालेली आहे. एकूण मतांपैकी तब्बल निम्मी मते एकट्या सुधाकर अडबाले यांनी घेतलेली आहेत. आतापर्यंत १४ हजार मतांचा लीड म्हणजे अडबालेंच्या विजयाची खात्री दिली जात आहे. विजयासाठी आवश्‍यक असलेल्या मतांचा कोटा अद्याप ठरला नसला तरी अडबाले हा कोटा पूर्ण करतील, असे सांगितले जात आहे.

वैध मतांची पूर्ण मोजणी झाल्यानंतर कोटा ठरणार आहे. अजून ६ हजार मते मोजायची शिल्लक आहेत. या मोजणीत अडबाले मागे जातील, असे दूरवर कुठेही दिसत नाही. आतापर्यंतच्या २८ हजार मतांचा ट्रेंड बघितला तर उर्वरित ६ हजार मतांपैकी अर्ध्यापेक्षा कमी मते जरी त्यांनी घेतली. तरीही त्यांचा विजय दृष्टिपथात दिसतो. त्यामुळे अडबालेंच्या समर्थकांमध्ये आनंदाला उधाण आल्याचे बघायला मिळत आहे.

भाजपसाठी धोक्याची घंटा?

या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार निवडून आल्यास भाजपसाठी ती धोक्याची घंटा ठरणार आहे. कारण गेली १२ वर्षे येथे भाजपचे आमदार म्हणून नागो गाणार होते आणि आताही हा मतदारसंघ भाजपचाच गड आहे, असे सांगितले जात होते. पण आजचा निकाल अडबालेंच्या बाजूने लागला, तर पदवीधरप्रमाणे भाजपचा हासुद्धा गड उद्ध्वस्त होणार आहे.

नागपूर पदवीधर निवडणुकीतही भाजपला विजयाची पूर्ण खात्री होती. पण महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र येऊन लढले आणि भाजपचा पार धुव्वा उडवला होता. आज त्याची पुनरावृत्ती होते का, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT