Sudhir Mungantiwar 
विदर्भ

Sudhir Mungantiwar: भाऊ-बहिणीविषयी वादग्रस्त विधान करणारे मुनगंटीवार अडचणीत; काँग्रेसची पोलिस ठाण्यात धाव

Chandrapur Lok Sabha Constituency 2024: सुधीर मुनगंटीवार यांचे विचार आणि भाषा किती असांस्कृतिक आहे हे काल महाराष्ट्रातील जनतेने बघितलं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या अशा विचारांना महाराष्ट्रातील जनता योग्य धडा शिकवेल, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

Mangesh Mahale

राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी भाऊ-बहिणींच्या नात्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी मुनगंटीवार यांचा निषेध व्यक्त करीत पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी या ओबीसीबहुल लोकसभा मतदारसंघात (Chandrapur Lok Sabha Constituency 2024) भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी प्रचारास प्रारंभ केला आहे.

काँग्रेस कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी मुनगंटीवार यांच्या विरोधात जाफ्राबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चंद्रपूर येथे झालेल्या सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेसमधील कार्यकर्त्या भाऊ-बहिणीच्या नात्याबाबत वादग्रस्त विधान केले. हजारो महिला समोर बसलेल्या असताना त्यांनी अश्लील शब्दाचा वापर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावर सोशल मीडियावर त्यांना नेटकरी ट्रोल करीत आहेत. त्यावर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "आणीबाणीदरम्यान काँग्रेसने विरोधकांची माहिती काढण्यासाठी भावा-बहिणीला एका खाटेवर झोपवून अत्याचार केले. तो भाषणातील संदर्भ होता, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही पायदळी तुडवून माध्यमांना कुलूपबंद करून- निरपराध नागरिकांना कारागृहात टाकल्यावर काँग्रेस लोकशाही रक्षणाची भाषा करते, असे ते म्हणाले. शीख दंगलीत निरपराध शीख धर्मीयांना मारणारे हुकूमशाह कोण आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आपल्या दारुण पराभवाच्या भीतीपोटी काँग्रेस पक्षावर अत्यंत हीन दर्जाची टीका करणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांचा जाहीर निषेध, असे टि्वट महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या हॅडलवरून केले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचे विचार आणि भाषा किती असांस्कृतिक आहे हे काल महाराष्ट्रातील जनतेने बघितलं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या अशा विचारांना महाराष्ट्रातील जनता योग्य धडा शिकवेल, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT