Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar News : आधे इधर जाओ, आधे उधर जाओ; मुनगंटीवार असं कुणाला म्हणाले ?

Atul Mehere

Sudhir Mungantiwar News : नरेंद्र मोदी सरकार तिसऱ्यांदा निवडून आले, तर ही कदाचित शेवटची निवडणूक ठरेल, असे कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्याचा आज राज्याचे वने, मत्स्यव्यवसाय आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

आज (ता. १) नागपुरात आले विमानतळावर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते. कुणाचेही नाव न घेता ते म्हणाले, त्यांचे २०२४चे खातेवाटपही झाले होते, अन् मग नंतर त्यांचीच आपसात भांडणेही झाली. मग ममतांनी बाय बाय केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेसुद्धा शेवटपर्यंत मानले नाहीत आणि बिहारचे नितीश कुमार तर म्हणतात की, कमल असेल तरच विकास होईल. त्यामुळे इंडिया आघाडीचे भवितव्य काय असेल, याचा अंदाज कुणीही बांधू शकतो.

राहुल गांधी यांची अवस्था म्हणजे ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ’, अशी झाली आहे, असे म्हणत त्यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींनाही टोला लगावला. अंतरिम बजेटवर बोलताना ते म्हणाले, मोदींनी २०४७ पर्यंत देशाला विश्र्वगौरव करण्याचा जो संकल्प केला आहे, त्या दृष्टीने या अर्थसंकल्प पावले टाकली गेली आहेत. शेवटच्या व्यक्तीलाही प्रत्येक योजनेचा लाभ मिळेल, असा हा अर्थसंकल्प आहे. यापूर्वी विरोधकांनी कोणते दिवे लावले ते सांगावे मग विरोध करावा.

देशात 36 लक्ष कोटी रुपये वितरित केले. 1 कोटी लोकांना सोलरमार्फत वीज मिळणार आहे. भारत तिसरी इकॉनॉमिक होणार आहे. 2013मध्ये विरोधकांनी बजेटमध्ये काय दिले होते. देशाची किती प्रगती केली ते आधी सांगावं. संयमाने बसले तर दोन मत विरोधकांना जास्त मिळतील, असाही टोला मंत्री मुनगंटीवार यांनी लगावला. खाजगी बाजार समिती संदर्भात कुणी बोलत असेल तर गोष्ट निराळी, पण सहकारी बाजार समितीत निवडणूक न घेण्याचा कुठलाही निर्णय नाही. असं काही असेल तर मी माहिती घेतो, असेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांच्या नाशिकमधील सभेबाबत बोलताना म्‍हणाले, प्रत्येक पक्षाला अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा. त्यांनी मोर्चेबांधणी केली पाहिजे. आपल्याला विकासात योगदान द्यायचे असेल, तर अवश्‍य द्या. कारण देशाचा विकास करायचा असेल तर मोदींशिवाय कुणी करू शकतनाही, हे लोकांच्या लक्षात आले आहे. संजय राऊत यांनी मनसेला दिलेल्या ऑफरबद्दल विचारले असता, महाविकास आघाडीला आ मदतीची गरज आहे. त्यांना आवश्‍यकता वाटत असल्याने त्यांनी मनसेला ऑफर दिली असावी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार यांच्याकडे आम्ही सकारात्मकपणे पाहतो. देशाच्या हितासाठी त्यांच्यासारखी सद्बुद्धी ईश्वराने प्रत्येकाला द्यावी, असे सांगताना शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना करण्याचा प्रश्नच नाही. एखाद्या व्यक्तीने जर तुलना केली तर ती मोदींनी केली असं होत नाही. आपल्या राज्यात शरद पवारांना जाणता राजा म्हटलं जातं. बाळासाहेब ठाकरे यांना प्रति शिवाजी म्हटलं जात होतं कोणी तुलना केली? त्यांना विस्मरण एवढं आहे, बर झालं पीएचडी केलेली नाही, असे म्हणत मुनगंटीवार यांनी पुन्हा टोला लगावला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT