Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar News : ‘ती’ पत्रिका राज्याच्या प्रोटोकॉलनुसारच छापण्यात आली !

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Legislative Council News : राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज सायंकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव आहे, पण विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांचे नाव नाही, हा मुद्दा आज सभागृहात चांगलाच तापला. (It is the highest award of our state)

या मुद्यावर भाई जगताप चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी सरकारला याचा जाब विचारला. यावर बोलताना वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आपले राज्य प्रथा, परंपरा, कायदे, मान सन्मान यावर चालतो. विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती किंवा राज्य आणि देशातील सांविधानिक पदावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान होईल, अशी कृती करू खरं तर कुणीच करू नये.

सभापतींचे नाव पत्रिकेत नाही, यात काही दोष नाही. पत्रिका राज्याच्या प्रोटोकॉलनुसार छापण्यात आल्या आहेत. विधानसभेचे अध्यक्ष त्या क्षेत्राचे विधानसभा सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे नाव आहे. मुंबईतील सर्वांची नाव टाकण्यात यावी, असा एक आग्रह होता. पण सामान्य प्रशासन विभाग त्यावर चर्चा करेल. हा आपल्या राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

काही चर्चा सभागृहात न करता दालनात केलेल्या चांगल्या असतात. दीपक केसरकर पालकमंत्री आहेत म्हणून त्यांचेही नाव पत्रिकेत आहे. तरीही सामान्य प्रशासन विभागाकडून आणि प्रोटोकॉल विभागाकडून माहिती घेऊ आणि तपासू. पण यावरून गोंधळ करून नये. सभापती आणि सर्व दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना भेटून निमंत्रण द्यावे, असे मी संबंधित यंत्रणेला सांगितलेले आहे. त्यांनी तसेच केलेसुद्धा. त्यामुळे हा विषय वाढवण्यात अर्थ नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.

खालचं सभागृह श्रेष्ठ का वरचं सभागृह श्रेष्ठ, हे प्रश्न निर्माणच का व्हावे, असा प्रश्‍न एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) यावर उत्तर दिले. ते म्हणाले, सभापतींचा अवमान व्हावा अशी कृती शासनाकडून होणार नाही. त्रुटी असतील तर दूर करू. प्रोटोकॉल विभाग माझ्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांशी (Chief Minister) चर्चा करून त्यात बदल करण्याची गरज असेल तर नक्की करू. अध्यक्ष, सभापती सांविधानिक अराजकीय पद आहेत. अशा कार्यक्रमांमध्ये त्यांच्याबद्दल काय भूमिका असावी, याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT