Sudhir Mungantiwar and Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar News : एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्षाची सही असते, विरोधी पक्षनेत्याची नाही; मुनगंटीवारांनी अजित पवारांना डिवचले !

सरकारनामा ब्यूरो

Confusion in revenue department transfers News : मॅटने एखाद्या अधिकाराच्या बदली संदर्भात मत व्यक्त केले असेल तर राज्य सरकार खुलासा करेल. शेवटी हा अधिकार राज्य सरकारचा आहे. बदली कायद्यानुसार राज्य सरकारने अंमलबजावणी करायची असते, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार महसूल विभागातील बदल्यांच्या संदर्भात बोलताना म्हणाले. (The state government will give a reasoned answer to it)

महसूल विभागातील बदल्यांमध्ये अनिमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या कार्यवाहीनंतर एखादा खुलासा आला असेल, तर राज्य सरकार त्याचे तर्कसंगत उत्तर देईल आणि त्याही उपर जाऊन सरकारकडे तर्कसंगत उत्तर नसेल, तर न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करेल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

आज (ता. २२) नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. जाकीर नाईक यांनी एक संस्थेला दिल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. याबाबत विचारले असता, तेव्हा विखे पाटील काँग्रेसचे नेते होते. तेव्हा काँग्रेसला काही लोक अशा पद्धतीची मदत करायचे. काँग्रेसमध्ये असताना त्यांचा संबंध आला असेल. पण आता त्यांनी विचारामध्ये मूलभूत बदल केला आहे. त्यांची विचारधारा बदलली आहे. त्यामुळे आता जाकीर नाईकचा काही विषय नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद सोडण्याची तयारी दर्शवत. प्रदेशाध्यक्ष पद मागितले आहे. यासंदर्भात विचारले असता, निवडणुकीत राजकीय पक्षाचे उमेदवार जाहीर करताना एबी फॉर्म वर अखेरी पक्षाध्यक्षाची स्वाक्षरी लागते. विरोधी पक्षनेत्याची स्वाक्षरी त्यावर नसते. भविष्याचा वेध घेत अजित पवार असे बोलले असावे आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रदेशाध्यक्ष होण्याचे ठरवले असेल, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात त्यांचा बीआरएस पक्ष वाढवू बघत आहेत. यासंदर्भात बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. बीआरएसच्या बाबतीत सांगायचे झाल्यास आदी तो टीआरएस होता आणि तेलंगणामध्ये त्यांचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या मुलीचा पराभव का झाला, हे त्यांनी महाराष्ट्रात पाय रोवण्यापूर्वी सांगावे.

इटल्ला राजन्ना त्यांचे अर्थमंत्री आणि नंतर आरोग्यमंत्री होते. त्यांनी टाटा करत भाजपमध्ये (BJP) प्रवेश का केला? शेवटी इटल्ला राजन्ना भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. केसीआर यांना तेलंगणात त्यांचा पराभव दिसत आहे, त्यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) येऊन भाजपचे लक्ष विचलित करायचे आणि तेलंगणात पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे, हेच त्यांचे एकमेव ध्येय आहे, असेही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT