Sudhir Mungantiwar Receving Certificate. Sarkarnama
विदर्भ

Ayodhya Ram Mandir : रामनामाचा गजर करीत चंद्रपुरात नोंदविला गेला विश्वविक्रम!

Sudhir Mungantiwar : पुन्हा काही तरी आगळेवेगळे करून दाखविले

संदीप रायपूरे

Chandrapur News : राजकारण असो की समाजकारण वेगळेपण आणि सुधीर मुनगंटीवार हे नाव एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. राजकारणात सक्रिय झाल्यापासून आजतायागात सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाने अनेक विक्रम आहेत. वनमंत्री असताना केलेली वृक्षलागवड असो किंवा अन्य कोणतेही धाडसी निर्णय, या सर्वांच्या नोंदी पडताळल्यास त्यात कुठे ना कुठे सुधीर मुनगंटीवार हे नाव सापडेलच. असाच एक विश्वविक्रम त्यांनी पुन्हा एकदा चंद्रपूर येथे शक्य करून दाखविला आहे.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राम मंदिराच्या आंदोलनात स्वत: कारसेवा दिली आहे. अशातच 22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. अनेक वर्षांपासूनचे मंदिर निर्माणाचे स्वप्न साकार होत असल्याने देशात सध्या उत्सवाचे वातावरण आहे. त्यातूनच चंद्रपुरातही श्रीराम मंदिर लोकार्पणाचा उत्सव साजरा केला जात आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी व्यापक पुढाकार घेतला आहे.

श्रीरामनामाचा गजर करीत देशात कुठे सोन्याचा अश्व तयार केला जात आहे, तर कुठे विक्रमी रामप्रसाद लाडू बांधला जात आहे. अशातच या उत्सवात चंद्रपुरात नवा विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे. हा विश्वविक्रम आहे 33 हजार 258 प्रज्वलित दिव्यांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ हे रामनाम साकारण्याचा. अयोध्येत सुरू असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सध्या चंद्रपुरात तीन दिवसीय उत्सव सुरू आहे. याच उत्सवाचा एक भाग म्हणून चांदा क्लब ग्रांडडवर हा रेकार्ड नोंदविला गेला.

चंद्रपुरातील या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकार्डमध्ये करण्यात आली आहे. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत 33 हजार 288 उजळल्या पणत्यांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ साकारण्यात आले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयानेही या उपक्रमात सहकार्य केले. 100 चौरस फूट जागेवर ‘सियावर रामचंद्र की जय’ हा 11 अक्षरी मंत्र साकारण्यात आला. उजळण्या पणत्यांमुळे चांदा क्लब मैदानावर उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. चंद्रपुरात हा विश्वविक्रम व्हावा, यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: पुढाकार घेतला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गिनीज बुक ऑफ रेकार्डच्या प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदवित प्रज्वलित पणत्यांची मोजणी केली. त्यानंतर एका कार्यक्रमात या ऐतिहासिक कार्यक्रमाची गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाल्याचे जाहीर करण्यात आले. या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र चंद्रपूरचे पालकमंत्री या नात्याने सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आले. मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार या देखील यावेळी उपस्थित होत्या.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT