Sujat Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Sujat Ambedkar : सुजात आंबेडकर कडाडले; म्हणाले, या संघवाल्यांना समूळ उखडून फेका !

Akolas Dhammachakra Pravartan Din : आंबेडकरांची चौथी पिढी चढली धम्म व्यासपीठावर.

जयेश विनायकराव गावंडे

Akola District Political News : सुजात आंबेडकरांच्या रूपाने आंबेडकरांच्या चौथ्या पिढीने अकोल्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमातील धम्म व्यासपीठावर पदार्पण केले. अकोल्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेला बुधवारी (ता. २५) सुजात आंबेडकर यांनी संबोधित केले. (The fourth generation of Ambedkars ascended the Dhamma platform)

या वेळी ‘जय भीम’च्या घोषणांनी पंचक्रोशी दणाणून गेली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षावर सुजात आंबेडकर यांनी जोरदार प्रहार केले. देशात आरएसएस आणि भाजपचं राज्य आल्यापासून दलितांना मारण्यात आलं. त्यांच्यावर अमानुष अत्याचार वाढले. कायदा व सुव्यवस्थाही या मनुवाद्यांनी काबीज केली आहे. त्यामुळे एकीकडे त्यांचे कार्यकर्ते अत्याचार करीत आहेत, तर दुसरीकडे ‘खाकी’ही त्यांच्या बाजूने आहे, असे सुजात आंबेडकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मणिपूरची घटना ताजीच आहे. तीन महिने मणिपूर जळत होतं. तेथील अत्याचार तर काळीज पिळवटून टाकणारे होते. परंतु त्याबाबत बोलायलाही सत्ताधाऱ्यांची हिंमत झाली नाही. संघवाल्यांनी आणि भाजपनं आता नकली आंबेडकरवादी समाजात शिरवले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून पैसे खायचे आणि आंबेडकरी जनतेमध्ये फूट पाडायची हा त्यांचा धंदा आहे. त्यामुळे फूट पाडणाऱ्यांचा ‘पॅटर्न’ वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सरकारचा आरक्षण पूर्णपणे बंद करण्याचा डाव असल्याचे नमूद करीत सुजात आंबेडकर म्हणाले की, ठेकेदारी पद्धतीने आता राज्यकर्ते देश आणि महाराष्ट्र चालवायला देण्यासही मागेपुढे पाहणार नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अस्वच्छता पसरली आहे. कोणता नेता कुणासोबत आहे, हे कळायला मार्ग नाही. नेत्यांच्या पदांसाठी उड्या सुरू आहेत.

देशाचं आणि राज्याचं राजकारण नरेंद्र मोदी, अमित शाह, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एखाद्या क्रिकेटच्या सामन्यासारखं करून ठेवलंय. या राजकारण्यांना कितीही खेळायचं असेल तर खेळू द्या, पण लोकांच्या भावनांशी खेळाल तर लोक जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा ईशाराही सुजात आंबेडकर यांनी दिला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT