Sunil Kedar and Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Sunil Kedar News : नागपुरातील सभेला अजित दादा येणारच नव्हते, सुनील केदारांनी सांगितले कारण !

Ajit Pawar : त्यांनी नागपुरात भाषण करण्याचे टाळले.

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar and Sunil Kedar News : ज्यावेळी या राज्यात आम्ही विरोधी पक्षात होतो, त्यावेळी चांदा ते बांधा अशी यात्रा काढली होती. त्यावेळी १९ आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यावेळी हा विषय लोकांमध्ये नेण्याचं ठरलं होतं, त्यानंतर राज्यात सत्ता आली. तेव्हा अजित पवार यांनी मोठं सहकार्य केलं होतं. (Ajit Pawar had given great support)

नागपूरच्या सभेला अजित दादा येणारच नव्हते. पण मी विनंती केली, त्या विनंतीला मान देऊन ते आले. मात्र त्यांनी भाषण करावे की नाही, हा संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विषय होता. तिन्ही पक्षांतील प्रत्येकी दोन-दोन नेते भाषण करतील, असे ठरले होते आणि ज्या नेत्यांनी छत्रपती संभाजीनगरला भाषण केले, त्यांनी नागपुरात भाषण करण्याचे टाळले. यामध्ये कुठलेही राजकारण आहे असं काही दिसत नाही, असं आमदार सुनील केदार म्हणाले.

तिन्ही पक्षांचे दोन-दोन नेते भाषण करतील, असे ठरले होते. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन नेत्यांची भाषणे झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड यांनी भाषणे दिली. याबाबत आमदार केदार म्हणाले, जितेंद्र आव्हाड माझा जिवश्‍च कंठस्थ मित्र आहे. त्यामुळे मीच त्यांना ऐन वेळेवर बोलण्याचा आग्रह करू शकतो. त्यांनी मान देत भाषण केले.

प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. दादांचा वेगळा असेल आमचा वेगळा असू शकतो. देशाच्या राजकारणात पवार कुटुंबीयांचे वेगळे वलय आहे. त्यामुळे अजित पवारांचे नाव दररोज अशा पद्धतीने चर्चेत आणणे योग्य नाही. त्यामुळे पवार कुटुंबीयांवर आघात होऊ शकतो. राज्याच्या विकासात अजित दादांचं मोठं योगदान आहे. ते संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व आहे, असेही केदार म्हणाले.

दादांना हसू द्या..

अजित पवार नागपुरातील (Nagpur) सभेत बोलले नाही. पण अधूनमधून ते हसत होते. यामागचे रहस्य काय, असे विचारले असता, अलीकडे अजित पवार (Ajit Pawar) हसायला लागले आहेत, त्यांना असेच हसू द्या, असे केदार यांनी सांगितले. महाविकास आघाडीची नागपुरातील वज्रमूठ सभा यशस्वी झाल्यानंतर कॉंग्रेसचे पुढचे नियोजन काय, असे विचारले असता, आमच्या पुढे काम करण्यासाठी आता अनेक विषय आहेत.

वेगळी कलाटणी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. आम्ही यासाठी पुढील काळात लढा देणार आहोत. सत्ताधाऱ्यांचे राज्याला बदनाम करण्याचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. वज्रमूठ सभेने महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम दिसेल, असेही आमदार केदार (Sunil Kedar) यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT