Sunil Kedar and Others
Sunil Kedar and Others Sarkarnama
विदर्भ

Sunil Kedar : फडणवीसांच्या कार्यक्रमात काळी फीत लावून बसले सुनील केदार, कारण...

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Former Minister Sunil Kedar's News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपुरात केंद्र शासन पुरस्कृत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, जल जीवन मिशन अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ३७२ पाणी पुरवठा योजनांचे भूमिपूजन होत आहे. या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार सुनील केदार सहकाऱ्यांसह पोहोचले. पण व्यासपीठावर न बसता ही सर्व मंडळी खाली बसली. (Instead of sitting on the dais, all these people sat down.)

आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्त पाणी पुरवठा योजनांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे. सध्या हा कार्यक्रम सुरू आहे. येथे राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकर्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत आणि त्यांचे काही सहकारी आले. आल्यानंतर आमदार केदार व्यासपीठावर बसतील, अशीच आयोजकांची अपेक्षा होती. पण तसे न करता ते खाली असलेल्या खुर्च्यांवर बसले.

येवढेच नव्हे तर आमदार केदार व त्यांचे सहकारी काळ्या फिती लावून तेथे बसले. त्यामुळे तेथे एकच चर्चा सुरू झाली. आमदार केदार नक्की कशाचा निषेध करत आहेत. हे कुणाला कळले नाही. त्यानंतर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता. महाराष्ट्र शासनाने नागपूर जिल्हा परिषदेचा निधी थांबविलेला आहे. नागपूर जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसची म्हणजेच सुनील केदार यांची एकहाती सत्ता आहे.

राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे शासन आहे. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेचा विकास निधी थांबविलेला आहे. राज्य सरकारच्या या कृत्याचा निषेध आमदार केदार यांनी या पद्धतीने केला असावा, अशी चर्चा तेथे रंगली. फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) कार्यक्रमात सुनील केदारांचे हे नाराजी नाट्य चांगलेच रंगले. वृत्त लिहिस्तोवर देवेंद्र फडणवीस कार्यक्रम स्थळी पोहोचलेले नव्हते.

सुनील केदारांच्या (Sunil Kedar) ऐन वेळेवर केलेल्या या निषेध आंदोलनाची दखल फडणवीस घेतील का, हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे किंवा या निषेध आंदोलनामुळे कार्यक्रमस्थळी काही गोंधळ उडतो का, अशीही शक्यता काहींना वाटत आहे. केदारांचे हे आंदोलन नेमके कोणत्या दिशेला जाणार, हे कार्यक्रम झाल्यावरच कळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT